UPSC Exams: ५० विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला मुकले, कारण…

जालन्यावरून आलेल्या विद्यार्थ्याने परीक्षेला येताना कसा गोंधळ झाला याची माहिती दिली.

116
UPSC Exams: ५० विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला मुकले, कारण...

देशभरात रविवारी, (१६ जून) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (UPSC Exams) पार पडत आहेत. संभाजीनगरमध्येदेखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झालेत, मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे त्यांना त्यांचे कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आले नाही. शहरात जवळपास ५० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. (Google Map)

युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत, मात्र गुगल मॅपच्या आधारे परीक्षेचं सेंटर शोधणाऱ्या अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना परीक्षेला मुकावं लागलंय. विवेकानंद कॉलेजचा पत्ता प्रत्यक्ष ठिकाणापासून गुगल मॅपवर १५ किमी दूर अंतरावर दाखवला जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचता आलं नाही. (Google Map)

(हेही वाचा – Indian Railways: भारतीय रेल्वेचे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव, कारण काय ?)

परीक्षा केंद्रात पोहोचायला २ मिनिटे उशीर झाला, तर…
जालन्यावरून आलेल्या विद्यार्थ्याने परीक्षेला येताना कसा गोंधळ झाला याची माहिती दिली. जालन्यावरून निघताना परीक्षा केंद्राचा पत्ता गुगलवर शोधला. विवेकानंद आर्ट्स, सरदार दलीप सिंग कॉमर्स एंड साइंस कॉलेज, समर्थनगर संभाजीनगर असा पत्ता होता. गुगलला टाकल्यानंतर इथून २० किमी लांब वडगाव एमआयडीसीतलं लोकेशन दाखवलं. तिथं पावणे नऊला पोहोचल्यावर पत्ता चुकल्याचं कळलं. तिथून पुन्हा कॉलेजवर आलो. मला २ मिनिटं उशीर झाल्यानं प्रवेश नाकारला.

सेंटर किंवा कॉलेज ‘गुगल मॅप’ दाखवत नाही…
परीक्षेसाठी जे सेंटर देण्यात आलंय ते कॉलेज गुगल मॅपवर दाखवत नाही. आताही लोकेशन फेच करत नाहीय असं विद्यार्थ्याने म्हटलं. मुलं अभ्यास करून केवळं गुगल मॅप किंवा प्रशासनाच्या छोट्या-मोठ्या चुकांमुळे परीक्षेपासून वंचित राहिले. बाहेर गावाहून येणाऱ्यांना शहर माहिती नसतं. गुगल दाखवतं तसं जातात तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सेंटर नसल्याचं लक्षात येतं. जवळपास ५० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावं लागल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.