अनिल जयसिंघानीनंतर संजय पांडे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरू; मोहित कंबोज यांचे ट्वीट

106

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी सध्या अनिक्षा जयसिंघानी पोलिसांच्या ताब्यात आहे. सोमवारी तिचे वडील आणि बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे. आता अनिल जयसिंघांनीनंतर माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणखीन एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटाडाऊन सुरू झाल्याचे ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. सध्या त्यांच्या ट्वीटची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

मोहित कंबोज ट्वीटमध्ये काय म्हणाले?

भाजप नेते मोहित कंबोज ट्वीट करत म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. जे लोकं दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात, ते स्वतः एकेदिवशी त्या खड्ड्यात पडतात.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1637710163087073280

दरम्यान याप्रकरणी आरोपी अनिक्षा जयसिंघांनीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली असून सोमवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – अमृता फडणवीस धमकी प्रकरण : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.