- मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या सभापतीपदाच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असून, या कालावधीत त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, सभागृह संचालनातील शिस्तबद्धता आणि विधिमंडळ प्रक्रियेला दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
19 डिसेंबर 2024 रोजी विधानपरिषदेने एकमताने प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांची सभापतीपदी निवड केली. त्यांच्या निवडीनंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांनी सभागृहात अभिनंदन करताना त्यांच्या कडून शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रभावी सभागृह संचालनाची अपेक्षा व्यक्त केली होती. प्राध्यापक म्हणून लाभलेली शिस्त, नियमांचे काटेकोर पालन आणि संयमी नेतृत्वशैली यामुळेच मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा उल्लेख आदराने “हेडमास्तर” असा केला होता.
(हेही वाचा – FDI in Insurance : विमा कंपनीत १०० टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देणारं विधेयक संसदेत मंजूर)
Q B B C : विधानपरिषद कामकाजाची स्पष्ट दिशा
सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी विधानपरिषद कामकाजासाठी Q B B C ही महत्त्वाची चतु:सूत्री मांडली, जी आज त्यांच्या कार्यकाळाची ओळख ठरत आहे.
- Q – Question Hour (प्रश्नोत्तर तास):
लोकहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत एका तासात जास्तीत जास्त प्रश्न पुकारले जावेत, यासाठी ठोस प्रयत्न. - B – Bill (विधेयक):
“No Bill should be passed without discussion” या तत्वावर भर देत, प्रत्येक विधेयकावर सखोल चर्चा, विद्वत मंथन आणि परिपूर्ण विचारप्रक्रिया. - B – Budgetary Process (अर्थसंकल्पीय प्रक्रिया):
अर्थसंकल्पीय चर्चेत सन्माननीय सदस्यांचा अधिकाधिक सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर. - C – Committee System (समिती पद्धत):
संसदीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या समिती पद्धतीला अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष लक्ष.
या चतु:सूत्रीचे सकारात्मक परिणाम अधिवेशनांमध्ये स्पष्टपणे दिसून येत असून, सभागृह कामकाज अधिक सुसूत्र, सौहार्दपूर्ण आणि फलदायी ठरत आहे.
(हेही वाचा – माफी मागा, नाहीतर परिणाम भोगा; पाकिस्तानी गँगस्टरची Nitish Kumar यांना धमकी)
समन्वय, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग
सभागृह सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची नियमित बैठक घेण्याची पद्धत प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी राबविल्यामुळे सभागृहातील समन्वय आणि सहकार्य वाढले आहे.
पेपरलेस डेमोक्रसी, वन नेशन वन प्लॅटफॉर्म आणि कायदेनिर्मितीत जनतेचा सहभाग वाढविण्याची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची संकल्पना, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधिमंडळात प्रभावीपणे राबवली जात आहे.
राष्ट्रीय पातळीवरील सक्रिय सहभाग
पटणा येथे झालेल्या 85 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांनी
“भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीसाठी संसद आणि राज्य विधानमंडळांचे योगदान” या विषयावर विचारमंथनात सहभाग घेतला.
भारतीय राज्यघटनेने देशाला मजबूत पाया दिल्यामुळेच भारत आज जागतिक स्तरावर शक्तीशाली राष्ट्र म्हणून उभा आहे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात तत्कालीन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमधून झाली, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शतक महोत्सव, अभ्यासवर्ग आणि ऐतिहासिक निर्णय
विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त, प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, नागपूर हिवाळी अधिवेशनात समारंभपूर्वक पार पडले.
फेब्रुवारी 2025 मध्ये, सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या पुढाकाराने, महाराष्ट्र विधिमंडळातील नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्ग (PRIDE संस्था, संसद भवन, नवी दिल्ली) आयोजित करण्यात आला. या दोन दिवसीय अभ्यासवर्गाचा सदस्यांना मोठा लाभ झाला.
(हेही वाचा – Cabinet : संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर : प्रेरणादायी स्मरण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त, मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अभिवादन प्रस्ताव मांडण्याची सूचना सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली. त्यानुसार दोन्ही सभागृहांनी या थोर लोककल्याणकारी राज्यकर्तीला मानवंदना अर्पण केली—हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील अभिमानास्पद क्षण ठरला.
याच पुढाकारातून ०६ मे २०२५ रोजी चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. संपूर्ण मंत्रिमंडळाचे छोटे गावात आगमन होण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना असून, चोंडी हे स्थळ पुढे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे.
गौरवशाली वाटचाल
एक वर्षाच्या कार्यकाळात शिस्त, समन्वय, तंत्रज्ञान आणि परंपरेचा सन्मान यांचा समतोल राखत प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी विधानपरिषदेला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, विधानपरिषदेला त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक उंची गाठण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

