माफी मागा, नाहीतर परिणाम भोगा; पाकिस्तानी गँगस्टरची Nitish Kumar यांना धमकी

121

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा व्हिडीओ आता आंतरराष्ट्रीय वादाचा विषय ठरला आहे. पाकिस्तानचा गँगस्टर शहजाद भट्टी (Shehzad Bhatti) याने एक व्हिडीओ जारी करत नीतीश कुमार यांना त्या महिलेकडे जाहीरपणे माफी मागण्याचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा – राजकीय भूकंप! Pradnya Satav यांचा आमदारकीला रामराम; काँग्रेसला मोठा धक्का, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण)

नेमकं प्रकरण काय आहे?

बिहारमध्ये एका सरकारी कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नीतीश कुमार नव्याने नियुक्त झालेल्या डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देत होते. त्याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो RJDनेही शेअर केला होता.

या व्हिडीओमध्ये नीतीश कुमार एका मुस्लिम महिला डॉक्टरशी बोलताना तिचा हिजाब पकडून ओढताना दिसत आहेत. या घटनेमुळे बिहारच्या राजकारणात आधीच मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

पाकिस्तानी डॉनची एंट्री आणि धमकी

आता या वादात पाकिस्तानचा कुख्यात डॉन शहजाद भट्टी याची एंट्री झाली आहे. भट्टीने एका व्हिडीओ संदेशात म्हटले की, “बिहारमधील (Bihar) एका मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने एका मुस्लिम महिलेसोबत जे केले, ते संपूर्ण जगाने पाहिले आहे.” या मुद्द्यावर आवाज उठवल्यानंतर आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचाही त्याने दावा केला.

ही चेतावणी नाही, शेवटची संधी आहे

शहजाद भट्टीने व्हिडीओमध्ये कठोर शब्दांत सांगितले की, मुख्यमंत्र्यांकडे अजूनही वेळ आहे आणि त्यांनी त्या महिला डॉक्टरकडे सार्वजनिकरित्या माफी मागावी. तसे न केल्यास संबंधित संस्थांनी कारवाई करावी, असेही त्याने म्हटले. व्हिडीओच्या शेवटी धमकीच्या सुरात तो म्हणाला, “नंतर असे म्हणू नका की मी चेतावणी दिली नव्हती.” (Nitish Kumar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.