CM Eknath Shinde : पंतप्रधानांना औरंगजेबाची उपमा देणे हा देशद्रोह; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मणिपूरमध्ये अमित शहा यांनी शेपूट घातल्याची टीका ते करतात. पण यांनाच शेपूटवाल्या प्राण्यांचे फोटो काढायची सवय आहे. वेळप्रसंगी शेपूट घालून दिल्लीत जाणारे, नोटीस आल्यावर घाम फुटणारे, वेळे आल्यानंतर शेपूट घालणारे कोण आहेत हे सगळे जाणतात. खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी कोणी शेपूट घातले होते असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

154
CM Eknath Shinde : पंतप्रधानांना औरंगजेबाची उपमा देणे हा देशद्रोह; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

ज्यांनी याकूब मेमनची कबर सजविली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांची साथ धरली. त्यांनी राष्ट्रभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची उपमा देणे हा देशद्रोह असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडले. याचे उत्तर महाराष्ट्रातील जनताच येत्या निवडणुकीत मतपेटीतून देणार असल्याचे ते म्हणाले. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा योग्यरितीने सुरू आहे. महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्याचीच व्यूहरचना पक्षाच्या बैठकीत ठरविण्यात आल्याचेही ते म्हणाले. (CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा दिली आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. खरे तर यांचीच वृत्ती औरंगजेबाची आहे. भावाला, बापाला सोडले नाही ही वृत्ती त्यांनीच दाखवली. अशांनी देशभक्त आणि राष्ट्रभक्त पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा देणे हा देशद्रोह आहे. ज्यांनी राममंदिर बांधले, ३७० कलम हटविले. अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणे हा अपमान आहे. महाराष्ट्रातील जनता या अवमानाचे उत्तर मतपेटीतूनच देईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – BJP Candidate Third List : भाजपाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी)

मणिपूरमध्ये अमित शहा यांनी शेपूट घातल्याची टीका ते करतात. पण यांनाच शेपूटवाल्या प्राण्यांचे फोटो काढायची सवय आहे. वेळप्रसंगी शेपूट घालून दिल्लीत जाणारे, नोटीस आल्यावर घाम फुटणारे, वेळे आल्यानंतर शेपूट घालणारे कोण आहेत हे सगळे जाणतात. खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी कोणी शेपूट घातले होते असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांच्या बददल विचारले असता, चर्चा झाली आहे योग्यवेळी योग्य निर्णय होईल. समविचारी पक्षांशी महायुतीत चर्चा सुरू आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांना शिवसेना मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.