चांद्रयान-३ चे प्रक्षेपण भारतीयांसाठी अभिमानाची बाब – सुधीर मुनगंटीवार

130
चंद्रयान-३ चे प्रक्षेपण भारतीयांसाठी अभिमानाची बाब - सुधीर मुनगंटीवार
चंद्रयान-३ चे प्रक्षेपण भारतीयांसाठी अभिमानाची बाब - सुधीर मुनगंटीवार

चांद्रयान-३ चे सफल प्रक्षेपण आम्हा सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. शुक्रवारी (१४ जुलै) श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देताना त्यांनी आशा व्यक्त केली की, लवकरच भारत हे यशस्वी मिशन सुरू करणारा चौथा देश असेल.

महाराष्ट्र सदन येथे आज महाराष्ट्र राज्याच्या २०१० च्या सांस्कृतिक धोरणाचा फेर आढावा घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या पूर्नविलोकन समितीची बैठक, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना, मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये इकॉनोमी मध्ये आम्ही पाचव्या क्रमांकावर आहोत आता तर फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनोमिक होत आपण जर्मन आणि जपानलाही मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा एक दृढ संकल्प केला.

(हेही वाचा – जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेत कौशल्य विकास केंद्राची उभारणी)

त्याच पद्धतीने विज्ञानामध्ये जेव्हा हे चंद्रयान यशस्वीपणे ४२ दिवसानंतर चंद्रावर पोहोचेल तेव्हा जगातल्या १९३ देशात आमचा देश चौथ्या क्रमांकाचा देश असेल ज्याचा अभिमान भारतीयांना निश्चित वाटेल. प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये याचा अभिमान निश्चितपणे निर्माण होईल आणि त्यादृष्टीने या मोहिमेकडे आपण सर्वजण पाहतो आहोत. आपल्या शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस मेहनत, कष्ट परिश्रम करत ‘पुन्हा एकदा घे भरारी’ म्हणत चंद्रयान दोनच्या नंतर सफलतेच्या मार्गावर चंद्रयान तीन चे प्रक्षेपण केले आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही चौथ्या क्रमांक निश्चितच गाठू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सांस्कृतिक धोरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुदधे व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.