Chandrakant Patil: मुलगा-मुलगी भेद नको, सर्वांनाच मोफत उच्चशिक्षण द्या, विधान परिषदेत मागणी

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांच्या घोषणेनंतर मुलींचे पालक आणि मुलींनी आनंद व्यक्त केला, मात्र मुलांनी पाटील यांच्या घोषणेनंतर नाराजी दर्शवली आहे.

140
Chandrakant Patil : पीएम-उषा योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी रुपये मंजूर

महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, राहाणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. त्यानुसार, जून २०२४ पासून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतीगृह मिळत नाही, त्यांना दरमहा ५ हजार ३०० रुपये देण्यात येतील.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री (Chandrakant Patil) यांच्या घोषणेनंतर मुलींचे पालक आणि मुलींनी आनंद व्यक्त केला, मात्र मुलांनी पाटील यांच्या घोषणेनंतर नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळावे, यासाठी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी बुधवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला.

सर्वच मुला-मुलींना भेद न करता शुल्क माफी द्यावी
शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर गरीब कटुंबातील मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मुलगा-मुलगी भेद न करता सर्वच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, तसेच मुलगा-मुलगी भेद न करता ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुला-मुलींना म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे तसेच ज्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, अशा सर्वच मुला-मुलींना भेद न करता शुल्क माफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Aaditya Thackeray यांना X वर ट्रोल का केले गेले? )

८०० कोर्स सरकारद्वारे मुलींना मोफत करता येणार
मुलींच्या पालकांना मुलींच्या शिक्षणासाठी १ रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. अगदी प्रवेश फीपासून ते परीक्षेच्या फीपर्यंत, सर्व खर्च हा राज्य सरकारद्वारे केला जाणार आहे. मेडिकल, इंजिनीयरिंगसारख्या महागड्या शिक्षणासोबत एकूण ८०० कोर्स सरकारद्वारे मुलींना मोफत करता येणार, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.