Pune Municipal Corporation : नीलेश राणेंची मालमत्ता पुणे महापालिकेकडून सील; काय आहे कारण ?

Nilesh Rane यांची पुण्यातील मालमत्ता महापालिकेने सील केली आहे. डेक्कन भागातील जागेचा व्यावसायिक कर न भरल्याने ही जागा पालिकेने सील केली आहे.

227
Pune Municipal Corporation : नीलेश राणेंची मालमत्ता पुणे महापालिकेकडून सील; काय आहे कारण ?
Pune Municipal Corporation : नीलेश राणेंची मालमत्ता पुणे महापालिकेकडून सील; काय आहे कारण ?

भाजप नेते नीलेश राणे (Nilesh Rane) यांच्या पुण्यातील मालमत्तेवर महापालिकेने कारवाई केली आहे. डेक्कन परिसरातील मालमत्तेचा व्यावसायिक कर न भरल्याने ही जागा पालिकेने सील केली आहे. या जागेवर तब्बल 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी होती. सध्या पुणे महापालिका थकित कराच्या प्रकरणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत आहे. (Pune Municipal Corporation)

(हेही वाचा – Mohammed Shami Surgery : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या पायावर शस्त्रक्रिया )

महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून कर थकबाकीदारांवर धडक कारवाई चालू केली आहे. ज्या ठिकाणी कोट्यावधी रुपये कर थकित आहेत, त्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे. कारवाई करतांना आधी नोटिफिकेशन पाठवण्यात येते आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली जाते.

पाठपुरावा केला पण

डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल आहे. त्यातील तीन मजल्यांवरील दुकानांचा कर भरणे बाकी होते. या मॉलची एकूण 5 कोटी 60 लाख रुपये थकबाकी होती. थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला होता. नोटीसही पाठवण्यात आली होती; मात्र तरीही कर भरला नसल्याने पालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

थकबाकी भरणार आहे – नितेश राणे

महापलिकेचे पैसे थकले असतील; म्हणून त्यांनी कारवाई केली. त्यात गैर काही नाही. या जागेची थकबाकी भरली नसती, तर त्याची वेगळी बातमी झाली असती. आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे. (Pune Municipal Corporation)

महापालिकेने चालू केलेल्या मोहिमेत 1983 कोटी कर वसुली झाली आहे. त्यासोबतच जप्तीचे प्रमाणही वाढवले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.