IPL 2024 Mumbai Indians : कोलकाता संघाविरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून का खेळला?

IPL 2024 Mumbai Indians : रोहित शर्माने या सामन्यात १२ चेंडूंत ११ धावा केल्या. 

103
IPL 2024 Mumbai Indians : कोलकाता संघाविरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून का खेळला?
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात २४ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि ११ सामन्यांतील आठव्या पराभवामुळे मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यातच कोलकाता विरुद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma) हा स्टार सलामीवीर पहिल्या डावात न खेळता इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फक्त फलंदाजीला आला. त्यामुळे रोहीतला इम्पॅक्ट खेळाडू का केलं, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, या चर्चेला संघातील एक खेळाडू पियुष चावलाने उत्तर दिलं आहे. (IPL 2024 Mumbai Indians)

रोहितची (Rohit Sharma) पाठ दुखावल्यामुळे तो क्षेत्ररक्षण करणार नव्हता आणि क्षेत्ररक्षण केलं नसतं तर जेवढा वेळ मैदानाबाहेर असेल तेवढा वेळ त्याला फलंदाजी करता आली नसती. त्यामुळे अखेर संघ प्रशासनाने त्याला सुरुवातीला अकरा खेळाडूंच्या संघातून वगळलं. त्यानंतर फलंदाजीच्या वेळी त्याचा समावेश इम्पॅक्ट खेळाडू म्हणून केला. (IPL 2024 Mumbai Indians)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: दिल्ली कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा भाजपामध्ये प्रवेश, ‘या’ ४ नेत्यांचाही प्रवेश)

मुंबईला १७० धावांचं आव्हानही पेलवलं नाही

‘रोहितची (Rohit Sharma) मागचे काही दिवस पाठ काहीशी दुखत होती. आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ते पाहता, रोहितला विश्रांतीही आवश्यक होती. त्यामुळे संघ प्रशासनाला त्याला नाईलाजाने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळवावं लागलं,’ असं स्पष्टीकरण पियुष चावलाने सामन्यानंतर दिलं. (IPL 2024 Mumbai Indians)

रोहितने (Rohit Sharma) सलामीला येत या सामन्यात १२ चेंडूंत ११ धावा केल्या. मुंबईला १७० धावांचं आव्हानही या सामन्यात पेलवलं नाही. आणि त्यांचा २४ धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक पांड्याचं नेतृत्व हा अख्ख्या हंगामात चिंतेचा विषय राहिला. लोकांकडून तो ट्रोल झालाच. शिवाय त्याने मैदानात घेतलेले काही निर्णय माजी क्रिकेटपटूंनाही रुचले नाहीत. त्यातच हार्दिकच्या नेतृत्वामुळे संघात दोन तट पडल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे रोहितसारख्या ज्येष्ठ खेळाडूला वगळल्याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर पियुष चावलाने स्पष्टीकरण दिलं आहे. (IPL 2024 Mumbai Indians)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.