T20 World Cup 2024 : न्यूझीलंडचा माजी खेळाडू कोरे अँडरसन अमेरिकन संघात कसा पोहोचला?

T20 World Cup 2024 : कोरे अँडरसन न्यूझीलंडकडून २०१५ चा विश्वचषक खेळला होता. 

72
T20 World Cup 2024 : न्यूझीलंडचा माजी खेळाडू कोरे अँडरसन अमेरिकन संघात कसा पोहोचला?
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन क्रिकेट मंडळाने टी-२० विश्वचषकासाठीचा संघ शनिवारी जाहीर केला आहे आणि विशेष म्हणजे त्यात न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू कोरे अँडरसनचं नाव आहे. अँडरसन २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडकडून खेळला होता. अगदी अंतिम सामन्यातही तो संघात होता. कोरे अँडरसनला अमेरिकेने नामनिर्देशित केलं आहे. (T20 World Cup 2024)

३३ वर्षीय अँडरसन २०१८ मध्ये न्यूझीलंडकडून सगळ्यात शेवटी खेळला होता. त्यानंतर गेल्यावर्षी तो अमेरिकेकडून कॅनडा विरुद्धची टी-२० मालिका खेळला. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Nagpur Earthquake : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के, अभ्यासकांनी सांगितले कारण; वाचा सविस्तर)

त्याने किवी नागरिकत्व सोडलं नसलं तरी त्याने अमेरिका हा आपला पालक देश असल्याचं नमूद केलं आहे. अमेरिकन संघाचा कर्णधार मोनांक पटेल हा भारतीय वंशाचा तरुण असून तो यष्टीरक्षक फलंदाज आहे. अपेक्षे प्रमाणेच या अमेरिकन संघात ८ भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. (T20 World Cup 2024)

आता निवडलेला संघ ह्यूस्टन इथं बांगलादेश विरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना १ जूनला अमेरिका आणि कॅनडा दरम्यान होणार आहे. (T20 World Cup 2024)

टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकन संघ

मोनांक पटेल (कर्णधार), एरॉन जोन्स (उपकर्णधार), स्टिव्ह टेलर, कोरे अँडरसन, सौरभ नेत्रावलकर, जेसी सिंग, हरमीत सिंग, नोशतुश केनिगे, शॅडली शॉकविक, नितिश कुमार, अँड्रियास गॉश, शयन जहांगीर, अली खान, निसर्ग पटेल व मिलिंद कुमार. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.