Devendra Fadnavis : फडणवीस, मुनगंटीवारांना ठार करण्याची धमकी देणारा बाबाराव मस्कीविरोधात गुन्हा दाखल

62

वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाने प्रसिद्धी मिळवलेले बाबाराव मस्की यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या अर्थाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती. त्यावरून भाजपच्या तक्रारीची दखल घेत राजुरा पोलिसांनी मस्की यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बाबाराव मस्की कट्टर विदर्भवादी

राजुरा तालुक्यातील बाबाराव मस्की हे कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जातात. तसेच ते अनोखे आंदोलनामुळे प्रसिध्द आहे. मस्की यांनी नुकतेच सोशल मिडीयावर फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुनगंटीवार यांच्यावर टीका करीत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बाबाराव मस्की यांच्याविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, संजय जयपूरकर, संदीप पारखी बाबुराव जिवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात बाबाराव मस्की यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा MNS : दुकानांवर मराठी पाट्या; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उरले ४ दिवस; मनसेने करून दिली आठवण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.