अपात्रतेचा निर्णय घेण्याच्या कालमर्यादेचे बंधन कोणी घालू शकत नाही – राहुल नार्वेकर

नवीन विधानभवन उभारण्याचा प्रस्ताव

229
माझ्यावर वेळेचे बंधन घालू शकत नाही! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा खुलासा
माझ्यावर वेळेचे बंधन घालू शकत नाही! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा खुलासा

मुंबई विधानसभेतील आमदार अपात्रतेच्या संदर्भात आपण किती दिवसात निर्णय घ्यावा याबाबत माझ्यावर कुणीही बंधन घालू शकत नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. आपण नोटीसा दिलेल्या प्रत्येक आमदारांची सुनावणी घेणार आहोत. अपात्रतेबाबत मी निर्णय दिल्यावरच संबंधितांना न्यायालयात जाता येईल असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या मागणीवर सुयोग्य वेळेत निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालायने ११ मे २०२३ च्या निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालाला पुढील महिन्यात १० ऑगस्ट रोजी तीन महिने पूर्ण होतील. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार अपात्रेबाबत तीन महिन्यात निर्णय घ्यावाच लागेल असे म्हटले आहे. याबाबत शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

विधानसभा अध्यक्षांकडून ७ जुलैला शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ५३ आमदारांना अपात्रतेबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदाराला वेळ देऊन प्रत्यक्ष सुनावणी घेणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या ९ मंत्र्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. यावर नियमातील तरतुदीनुसार निर्णय घेणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

(हेही वाचा – Love Jihad : ‘ती’ दहशतवादी तारिकाला लव्ह जिहादचे प्रशिक्षण द्यायची; उत्तर प्रदेश पोलिसांनी केला पर्दाफाश)

नवीन विधानभवन उभारण्याचा प्रस्ताव

संसदेच्या सेंट्रल व्हिस्टाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानभवनाची देखील नवीन इमारत बांधण्याचा विचार सुरू आहे. विधानभवनाच्या पार्किंगच्या जागेत नवीन विधानभवन बांधण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या विधानभवनाची इमारत अपुरी पडायला लागली आहे. विधानभवनात मोठया प्रमाणात अभ्यागत येत असतात. त्यामुळे सगळयांची सोय व्हावी यासाठी ही नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.