केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या “परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स” अहवालात महाराष्ट्र सातव्या स्थानावर

वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांसाठीचा एकत्रित अहवाल प्रकाशित

170
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या “परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स” अहवालात महाराष्ट्र सातव्या स्थानावर
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या “परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स” अहवालात महाराष्ट्र सातव्या स्थानावर

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०’ (पीजीआय) अहवालात महाराष्ट्र राज्याला सातवे स्थान प्राप्त झाले असून राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी शाळांच्या गुणवत्ता आणि श्रेणीच्या संदर्भात सातारा जिल्ह्याने ४३० गुणासंह राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. देशातील एकाही राज्याला पहिल्या पाच श्रेणींमध्ये स्थान मिळाले नाही. भारतीय शिक्षण व्यवस्था, जगातील सर्वात मोठ्या शिक्षण व्यवस्थांपैकी एक आहे. यामध्ये देशभरात सुमारे १४ लाख ९० हजार शाळा, ९५ लाख शिक्षक आणि विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेले सुमारे 26 कोटी 50 लाख विद्यार्थीच्यां समावेश आहे.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (DoSE&L) जिल्ह्यांमधील शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांसाठीचा, एकत्रित अहवाल (PGI-D) जारी केला. या अहवालात, जिल्हा स्तरावरील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या सर्वंकष विश्लेषणासाठी निर्देशांक तयार करून, या शिक्षण व्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. शालेय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमक्या कुठल्या क्षेत्रात बदल घडवून आणणे आवश्यक आहे ते प्राधान्य क्रमाने ठरवून सुधारणेची अधिकाधिक चांगली श्रेणी प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यांना मदत करणे, हे पीजीआय-डी चे अंतिम उद्दिष्ट आहे.

राज्यात सातारा जिल्हा अव्वल

पीजीआयमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांतील शाळांच्या गुणवत्ता आणि श्रेणीच्या संदर्भातील माहिती विचारात घेण्यात आली हेाती. त्यात २०२१-२२ मध्ये चार जिल्ह्यांतील शाळांनी चांगले गुणांकन मिळवून अती उत्तम श्रेणीत मान मिळवला असून ३२ जिल्हे ‘उत्तम’ या श्रेणीत आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याने ६०० गुणांपैकी ४३० गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. तर मुंबई-२ ने ४२४ गुणांसह दुसरे तसेच कोल्हापूर व नाशिक जिल्‌हयांनी ४२२ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने या पूर्वी, राज्यांसाठी शिक्षण व्यवस्थेचा कामगिरी वर्गवारी निर्देशांक (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स-PGI) तयार केला आणि संदर्भ वर्ष २०१७-१८ ते २०२०-२१ साठी अहवाल प्रकाशित करण्यात आला होता.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या टीकेवर छगन भुजबळांचा पलटवार; म्हणाले…)

राज्य कामगिरी वर्गवारी निर्देशांकाच्या यशावर आधारित, सर्व जिल्ह्यांच्या कामगिरीची वर्गवारी करण्यासाठी, सद्या जिल्ह्यांसाठी ८३ निर्देशक ठरवण्यात आले असून त्यांचे एकूण मूल्यमापन ६०० गुणांमध्ये केले आहे. या ८३ निर्देशकांची ६ गटांमध्ये विभागणी केली आहे. मिळालेले एकंदर परिणाम, वर्गातून केल्या जाणाऱ्या अध्यापनाची परिणामकारकता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल अध्ययन आणि प्रशासन प्रक्रिया मिळून सहा गट तयार केले असून १२ भागांमध्ये विभागले आहेत. पीजीआय-डी ने जिल्ह्यांसाठी दहा श्रेणी निश्चित केल्या आहेत. दक्ष, ही सर्वोत्तम श्रेणी आहे. सहा गटांपैकी एका गटात किंवा एकंदर सर्व सहा गट मिळून ज्या जिल्ह्याला ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळतात त्यांना दक्ष श्रेणी दिली जाते. दहा टक्क्यांपर्यंत गुण मिळणाऱ्या जिल्ह्यांना आकांक्षी-३ श्रेणी दिली जाते आणि ही श्रेणी सर्वात तळाची आहे. यामध्ये पहिल्या पाच श्रेणींमध्ये देशातील एकाही राज्य आणि केंद्रशासित राज्यांची नोंद होऊ शकली नाही. तर प्रचेष्टा-२ मध्ये केवळ चंदीगड आणि पंजाब राज्यांचा समोवश आहे. तर प्रचेष्टा- ३ मध्ये महाराष्ट्र, गुजरात, केरळदिल्ली, पुद्दुचेरी, तमिळनाडू या सहा राज्यांचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.