MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास आणि पैसे भरण्यास एक दिवसांची मुदतवाढ

196
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास आणि पैसे भरण्यास एक दिवसांची मुदतवाढ
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास आणि पैसे भरण्यास एक दिवसांची मुदतवाढ

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेमधे सहभाग घेणार्‍या अर्जदारांच्या सोयीकरिता २४ तासांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार मंडळातर्फे अर्ज सादर करण्यासाठी मंडळातर्फे उपलब्ध करवून देण्यात आलेली लिंक मंगळवार ११ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजे पर्यंतच कार्यरत राहील तसेच अर्जदारांना अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा मंगळवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहे. रविवार ९ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सोमवार १० जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कार्यरत नसल्यामुळे मुंबई मंडळाच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेणार्‍या इच्छुक अर्जदारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होऊ शकली नाही . त्यामुळ २४ तासांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असल्याचे मुंबई मंडळाने स्पष्ट केले आहे.

मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार ११ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील तर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील. तसेच १२ जुलै, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. १७ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. २४ जुलै, २०२३ रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – पोलीस असल्याचे सांगून श्रीमंत घरातील तरुणाचे अपहरण करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक)

मुंबई मंडळाच्या सोडत प्रणाली मध्ये अर्जदारांनी सादर केलेले १५ वर्ष वास्तव्याचे अधिनिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या दाखल्यांची पडताळणी ‘महाऑनलाइन’ या सरकारी संकेत स्थळावरून केली जाते. मात्र रविवार ९ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सोमवार दिनांक १० जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कार्यरत नसल्यामुळे मुंबई मंडळाच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेणार्‍या इच्छुक अर्जदारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होऊ शकली नाही . करिता मंडळातर्फे २४ तासांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान १० जुलै २०२३ पर्यंत एकूण १ लाख ३६ हजार ८३९ अर्जांची नोंदणी झाली असून त्यातील १ लाख ०९ हजार ८८३ अर्जदारांनी अर्जासोबतची अनामत रक्कम भरली असल्याचे म्हाडाने म्हटले आहे. भाजपचे रोहिदास लोखंडे यांनी शनिवार व रविवार सुट्टी असल्यामुळे नागरिकांना शेवटच्या दिवशीही व्हेरिफिकेशन न झाल्याने पैसे भरता आलेले नाही. त्यामुळे म्हाडाने गुरुवार व शुक्रवार अशा दिवशी अर्जाची अंतिम तारीख करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु तत्पूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाने एक दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.