Cabinet expansion : शिवसेनेच्या आमदारांचा हट्ट पूर्ण होणार; १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार?

107
Cabinet expansion : शिवसेनेच्या आमदारांचा हट्ट पूर्ण होणार; १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्रिपदाची शेखी मिरवता न आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना लवकरच गोड बातमी मिळणार आहे. कारण, १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, यावेळी किमान सहा राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाणार असल्याचे समजते.

राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ देताना इतर मित्रपक्षांसह पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळ विस्तार करता आला असता, मात्र तसे झाले नाही. शिवसेना-भाजपामधले इच्छुक बघ्याच्या भूमिकेत आणि अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ९ आमदार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताना दिसले. त्यापाठोपाठ महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. त्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज आहेत. शिवसेनेचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांनी तशी सल बोलूनही दाखवली आहे.

(हेही वाचा –  Jaipur Express Firing : असे घडले थरार नाट्य)

त्यामुळे शिवसेनेसह भाजपातील इच्छुकांचा अधिक हिरमोड न करता येत्या १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचे कळते. विस्तार होताच तातडीने पालकमंत्री जाहीर केले जाणार आहेत. जेणेकरून स्वातंत्र्यदिनी नवोदित मंत्री पपालकमंत्री म्हणून झेंडावंदन करू शकतील.

वाटप कसे होणार?

– सध्या राज्य मंत्रिमंडळात २९ मंत्री असून, १४ पदे रिक्त आहेत. त्यापैकी भाजपला सात आणि शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.
– शरद पवार गटातील काही नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न अजित पवार गटाकडून केले जात आहेत. त्यांच्यापैकी एक दोघांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.
– राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, पण भाजपच्या महिला आमदार वंचित राहिल्या. यावरून कमालीच अस्वस्थता आहे.
– त्यामुळे भाजपकडून मंत्रिपदे देताना दोन महिलांना संधी दिली जाणार असल्याचे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.