Parliament Budget Session 2024 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दहा दिवसाचे अधिवेशन ९ फेब्रुवारीपर्यंत चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या चालू कार्यकाळाचा हा शेवटचा अर्थसंकल्प होय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.

137
South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई वरून शिवसेना, भाजपा सोबतची मनसेची संभाव्य युती तुटणार?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर १ फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. (Parliament Budget Session 2024)

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दहा दिवसाचे अधिवेशन ९ फेब्रुवारीपर्यंत चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या चालू कार्यकाळाचा हा शेवटचा अर्थसंकल्प होय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) ३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. १७ व्या लोकसभेचे संसदेचे हे शेवटचे अधिवेशन असेल. यावेळी अर्थसंकल्प सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जाणार आहे. यामुळे केंद्र सरकारकडून काही मोठी घोषणा केली जाऊ शकते. (Parliament Budget Session 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजपचा बॉलिवूड-क्रीडा क्षेत्रातील चेहऱ्यांवर डोळा)

हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला

विशेष म्हणजे संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही (Winter session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. त्यादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा झाली आणि अनेक महत्त्वाचे कायदेही मंजूर झाले. हिवाळी अधिवेशनात संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याबाबतही विरोधी पक्ष केंद्राकडे जाब विचारत होते. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सभागृहात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. तर विरोधी पक्ष सभागृहात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे टाळत असल्याचे केंद्र सरकारने (Central Govt) म्हटले आहे. (Parliament Budget Session 2024)

हिवाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहातून १४० हून अधिक खासदारांना निलंबितही करण्यात आले होते. शिस्तभंगाच्या कारवाईचा भाग म्हणून दोन्ही सभागृहातील खासदारांना निलंबित करण्यात आले. यानंतर विरोधी पक्षांनी खासदारांच्या निलंबनावरून गदारोळ केला आणि संसद भवनावर मोर्चाही काढला. (Parliament Budget Session 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.