BMC Election : मुंबईत एकाच प्रभागात शिवसेनेचे दोन उमेदवार; महायुतीत संभ्रम की आखलेली रणनीती?

138
BMC : खड्डे मुंबईकरांसाठी... आराम सत्ताधाऱ्यांसाठी? अवघ्या पाच महिन्यांत पुन्हा 'आलिशान' गाड्यांचा नवा हट्ट!
BMC : खड्डे मुंबईकरांसाठी... आराम सत्ताधाऱ्यांसाठी? अवघ्या पाच महिन्यांत पुन्हा 'आलिशान' गाड्यांचा नवा हट्ट!
  • प्रतिनिधी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रोज नवी गणितं बदलत असतानाच, शिवडी विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक आणि गोंधळात टाकणारी घडामोड समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २०४ मधून शिवसेनेच्या नावाने दोन उमेदवारांनी एकाच वेळी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (BMC Election)

या प्रभागातून अरुण दळवी आणि अनिल कोकीळ या दोघांनीही शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही अर्जांच्या वेळी शिवसेनेच्या आमदार स्वतः उपस्थित होत्या. त्यामुळे हा प्रकार चुकून घडलेला घोळ आहे की जाणीवपूर्वक आखलेला डाव, हा प्रश्न अधिक ठळकपणे उपस्थित होत आहे. (BMC Election)

(हेही वाचा – Rajasthan मध्ये धोका टळला! टोंकमध्ये १५० किलो स्फोटकांसह कार जप्त; दोन देशद्रोही अटकेत!)

माघार कोण घेणार? सस्पेन्स वाढतोय

एकाच प्रभागात दोन अधिकृत उमेदवार असल्याने आता माघार कोण घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ येत असताना, महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा कस लागणार आहे. वेळेत निर्णय झाला नाही, तर मतांचे विभाजन होऊन थेट विरोधकांना आयती संधी मिळू शकते आणि ते महायुतीसाठी महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (BMC Election)

शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता

स्थानिक पातळीवर दोन्ही उमेदवारांचे समर्थक सक्रिय झाल्याचं चित्र आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आणि कुजबुज वाढली आहे. काही कार्यकर्ते हा प्रकार अंतर्गत गटबाजीचा परिणाम मानत आहेत, तर काही जण याकडे ‘सेफ गेम’ म्हणून पाहत आहेत म्हणजे शेवटच्या क्षणी एक उमेदवार माघार घेईल आणि दुसऱ्याला पूर्ण ताकदीने मैदानात उतरवलं जाईल. (BMC Election)

(हेही वाचा – India Steel Imports : भारतात आयात होणाऱ्या पोलादावर भारताची १२ टक्के अतिरिक्त शुल्क)

चित्रा वाघ यांची उपस्थिती-संकेत काय?

दोन्ही अर्जांच्या वेळी भाजपा आमदार चित्रा वाघ यांची उपस्थिती हा मुद्दा अधिकच चर्चेचा ठरतोय. महायुतीत सर्व काही ठरलं आहे का, की अजूनही जागावाटप आणि उमेदवारीवर संभ्रम कायम आहे? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. जर हे नियोजनपूर्वक घडले असेल, तर ही दबावाची रणनीती आहे का? आणि जर चूक असेल, तर समन्वयातील कमकुवतपणा उघड होतो. (BMC Election)

पुढचा निर्णय ठरणार निर्णायक

आता सर्वांच्या नजरा माघारीच्या अंतिम निर्णयावर खिळल्या आहेत. शिवडीतील हा प्रभाग केवळ एक वॉर्ड नसून, महायुतीच्या समन्वयाची चाचणी ठरणार आहे. एक उमेदवार माघार घेणार? की हा दुहेरी डाव विरोधकांसाठीच लाभदायक ठरणार? उत्तर लवकरच मिळेल तोपर्यंत शिवडीतील हा सस्पेन्स मुंबईच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार, हे निश्चित. (BMC Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.