BJP on Sanjay Raut : ‘त्या’ पक्षाचे चिन्ह ‘गाढव’ ठेवा, उरलीसुरली अब्रूही जाईल; भाजपाचा संजय राऊतांवर घणाघात

72
BJP on Sanjay Raut : ‘जीडीपी’वरून राऊतांना घेरलं; भाजपाचा थेट सवाल, “जी’ तरी कळतो का?”
  • प्रतिनिधी

BJP on Sanjay Raut                ​संजय राऊत यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’सारख्या फालतू संकल्पना मांडण्यापेक्षा स्वतःसाठी ‘मूर्ख आणि मंद जनता पार्टी’ स्थापन करावी. त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद स्वतःकडे घेऊन पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘गाढव’ ठेवावे. राऊतांच्या पात्रतेला हाच पक्ष शोभेल आणि तिथे त्यांना चांगला प्रतिसादही मिळेल, अशा अत्यंत तिखट शब्दांत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (BJP on Sanjay Raut)

​देशाशी गद्दारी करणाऱ्या काँग्रेसचे तळवे चाटू नका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने चिखलफेक करणे आणि तरुणांची माथी भडकवणे हाच संजय राऊतांचा एककलमी कार्यक्रम असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, चीनशी हातमिळवणी करून देशाशी गद्दारी करण्याचा इतिहास काँग्रेसचा आहे. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या आणि विदेशी निधीवर चालणाऱ्या काँग्रेसने इतरांना गद्दारी शिकवू नये. राहुल गांधींच्या देशविरोधी वक्तव्यांचे समर्थन करत राहिलात, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठाची उरलीसुरली ताकदही नष्ट होईल, असा इशारा त्यांनी दिला. (BJP on Sanjay Raut)

(हेही वाचा – US Iran deal hopes: अमेरिका-इराण चर्चेबाबत सकारात्मक आशा; भारताला मिळणार दिलासा)

​आधी स्वतःचे ‘रिपोर्ट कार्ड’ दाखवा, वॉर्डात तरी निवडून येऊन दाखवा!

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे रिपोर्ट कार्ड देशातील जनता तपासते आणि म्हणूनच त्यांना वारंवार सत्तेवर बसवते, असे सांगत बन यांनी संजय राऊतांना जाहीर आव्हान दिले. “राऊत, तुमचे स्वतःचे रिपोर्ट कार्ड काय आहे? तुमचे कार्ड केवळ अपयश, घोटाळे आणि महिलांना धमक्या देणे इतपतच मर्यादित आहे. जनतेसमोर गेलात तर मुंबई महापालिकेच्या एका वॉर्डातही तुम्ही निवडून येऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंची विधान परिषदेतील उपस्थिती अवघी ३१ टक्के आहे, तर खासदार म्हणून राऊतांनी स्वतःच्या निधीतून जनतेच्या हिताचे एकतरी काम केले आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (BJP on Sanjay Raut)

​रामनामाचा अपमान करणाऱ्यांना जनता घरी बसवणार!

‘जय श्रीराम’ या घोषणेला भ्रम म्हणणाऱ्या संजय राऊतांना बन यांनी कडक शब्दांत सुनावले. प्रभू रामचंद्रांना काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेसची आज देशात काय अवस्था झाली आहे ते सर्वांसमोर आहे. आता संजय राऊतही त्याच मार्गावर चालले आहेत. रामनामाचा अपमान करणाऱ्यांना देशातील जनतेने यापूर्वीही त्यांची जागा दाखवून दिली आहे आणि आगामी निवडणुकांमध्येही जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला. (BJP on Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.