हिंमत असेल तर चला ईडीच्या चौकशीला जाऊ, उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान

101

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली होती. त्याला आता उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ, असे आव्हान उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांना केले आहे.

काय चिंधीचोर वाटलो काय?

साता-यातील सभेत अजित पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्याला उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या गाडीचे टायरच दोन लाख रुपयांचे आहेत, मग मी कोणाकडून दोन लाखांची खंडणी का मागू? काय चिंधीचोर वाटलो काय? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोललो आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर चला, सर्वच ईडीच्या चौकशीला जाऊ. मी स्वतः चौकशीसाठी तयार आहे, असे अप्रत्यक्ष आवाहन उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांना केले आहे.

अजित पवारांची टीका

साता-याच्या माण तालुक्यात झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. सातारा एमआयडीसीत खंडणी मागत औद्योगिक वसाहतीची वाताहात उदयनराजे भोसले यांनी केल्याचा अप्रत्यक्ष आरोप अजित पवार यांनी केला होता. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.