एका मंत्र्याच्या नाराजीने पोलिसांच्या बदल्या स्थगित, भाजपचा घणाघात

92

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेश बुधवारी काढण्यात आले. मात्र बुधवारी ज्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील पाच अधिका-यांच्या बदलीच्या आदेशाला अवघ्या 12 तासांमध्ये स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये अप्पर पोलीस आयुक्तपदी नेमलेल्या अधिका-यांच्या बढतीला स्थगिती दिल्याने सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, गृहखात्याच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावरूनच भाजपने जोरदार महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे.

याच्यापेक्षा प्रशासकीय व्यवस्थेचे अधःपतन कोणते?

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेशाला स्थगिती दिल्याने भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणार साधला आहे. यासंदर्भात बोलतना ते म्हणाले, अजब सरकारची गजब कहाणी आहे, पोलीस विभाग ज्याच्यामुळे अनुशासन असते. खरंतर एखाद्या मंत्र्याच्या नाराजीने त्यांच्या बदल्या स्थगित होतात. याच्यापेक्षा जास्त प्रशासकीय व्यवस्थेचे अधःपतन असू शकत नाही. राज्यात वळसे पाटील यांच्या रुपात एक नामधारी गृहमंत्री आहे, ज्यांचे कोणी ऐकत नाही. कुणीही उठतं आणि त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करतं. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत, ज्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड आपण बघितले आहेत, जे फोनवर आदेश देतात. काही अदृश्य गृहमंत्री असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

(हेही वाचा – सामान्यांना आणखी एक झटका! आता स्वप्नातलं घर बांधणं होणार महाग )

… हे निर्दयी सरकार आहे

पहिल्यांदा भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हा जो पवित्र गणवेश आहे. या खाकीचा उपयोग वसुलीसाठी करण्यात आला आहे. ज्या लोकांना भ्रष्टाचार मोडून काढायचा त्यांच्या हातून भ्रष्टाचार करायला लावणार हे निर्दयी सरकार आहे. इतकेच नाही तर आज पोलीस विभागाचे एवढं राजकीयीकरण झाले आहे की पोलिसांना आधी विचारण्यात येते की तुम्ही काही कारवाई करणार असाल, कायदेबाह्य वागणार असाल, आम्ही सांगू तसे ऐकणार असाल, तर आम्ही तुम्हाला चांगली पोस्ट देतो. नैतिकतेचा, प्रशासनाचा, गुणवत्तेचा ऱ्हास, प्रशासनाचा दर्जा घसरवण्याचे काम या सरकारचे सुरू असून पुन्हा गाडी रुळावर आणण्यासाठी २५ वर्षे लागतील, असेही पुढे मुनगंटीवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.