भाजपने राजस्थान, मध्य प्रदेशसह ४ राज्यांतील निवडणूक प्रभारींची केली घोषणा

109
भाजपने राजस्थान, मध्य प्रदेशसह ४ राज्यांतील निवडणूक प्रभारींची केली घोषणा
भाजपने राजस्थान, मध्य प्रदेशसह ४ राज्यांतील निवडणूक प्रभारींची केली घोषणा

भाजपने शुक्रवारी राजस्थान आणि मध्य प्रदेशसह ४ राज्यांतील निवडणूक प्रभारींची घोषणा केली. प्रल्हाद जोशी यांच्याकडे राजस्थान, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मध्य प्रदेश, ओपी माथूर यांच्याकडे छत्तीसगड आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे तेलंगणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पक्षाने या राज्यांचे सहप्रभारीही नियुक्त केले आहेत. राजस्थानमध्ये जोशी यांच्यासह नितीन पटेल आणि कुलदीप बिश्नोई यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना छत्तीसगडमधील सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Kalyan : कल्याणमध्ये जलद प्रवासाचा मास्टर प्लॅन; वाहतूक प्रकल्पांमुळे मिळणार गती)

याशिवाय सुनील बन्सल यांची तेलंगणात सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ४ राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशात भाजप, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि तेलंगणात सध्या बी.आर.एस. सत्तेत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.