Bihar :   निवडणुकीतील पराभव लालू कुटुंबियांच्या जिव्हारी; मुलीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ

Bihar :      बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या परिवारात उभी फूट पडली आहे.(Bihar)

175

Bihar :      बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या परिवारात उभी फूट पडली आहे.(Bihar) लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांच्या एक्सवरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी माझ्या कुटुंबाशी संबंध तोडत आहे…” अशा आशयाची पोस्ट रोहिणी यांनी केली आहे. त्यामुळे आता आरजेडीच्या पराभवामुळे लालू कुटुंबात फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.(Bihar)

(हेही वाचा October Inflation : ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर विक्रमी नीच्चांकावर )

दरम्यान, बिहारमध्ये आरजेडीच्या पराभवानंतर रोहिणी आचार्यने तिच्या कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी संजय यादव यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे पक्षात गोंधळ निर्माण झाला. रोहिणी यांच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.(Bihar)

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा मोठा पराभव झाला. राजद फक्त २५ जागांवर कमी झाला. निवडणूक निकालानंतर लालू कुटुंबात कलह सुरू झाला आहे. लालूंची धाकटी मुलगी आणि तेजस्वी यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे.(Bihar)

रोहिणी आचार्य यांनी त्यांच्या कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रोहिणी आचार्य यांनी इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, “मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी नातेसंबंध तोडत आहे. संजय यादव रमीझ यांनी मला हे करण्यास सांगितले आणि मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.”(Bihar)

(हेही वाचा Crime News : दुबई, मुंबईत झालेल्या ५ ड्रग्ज पार्ट्यांत सेलिब्रिटींचा सहभाग; गुन्हे शाखेच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे )


विशेष म्हणजे, लालूंचे ज्येष्ठ सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी आधीच बंड केले असून आता कन्या रोहिणी यांनी राजकारण सोडले आहे.
लालू यादव यांच्या कुटुंबातील आणि राष्ट्रीय जनता दलातील फूट ही अलिकडची घटना नाही. तथापि, अलिकडच्या काळात ज्या प्रकारे राजकीय घटना घडल्या आहेत त्यावरून स्पष्ट होते की, राजदमध्ये सर्व काही ठीक नाही. या घटनांमुळे पक्षाच्या अंतर्गत कमकुवतपणा उघड झाला आहे.(Bihar)

लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांनी आधीच पक्ष आणि कुटुंब सोडले आहे. लालू प्रसाद यादव यांनी स्वतः त्यांना बाहेर काढले. त्यानंतर, बिहार निवडणुकीपूर्वी त्यांनी जनशक्ती जनता दल हा स्वतःचा पक्ष स्थापन करत राजदविरोधात उघडपणे निवडणूक लढविली. तथापि, त्यांना स्वतःची जागा गमवावी लागली. दुसरीकडे, रोहिणी आचार्य यांच्या निर्णयामुळे लालू कुटुंबातील ऐक्याबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.(Bihar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.