Crime News : दुबई, मुंबईत झालेल्या ५ ड्रग्ज पार्ट्यांत सेलिब्रिटींचा सहभाग; गुन्हे शाखेच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे

135
Drug Smuggling Arrest : पुरी एक्सप्रेसमधून गांजाची वाहतूक; २ अल्पवयीन मुलांना अटक
  • प्रतिनिधी 

डी-गँगने दुबई आणि भारतातील काही भागात बॉलीवूड सेलिब्रिटींनी आयोजित केलेल्या कथित ड्रग्ज पार्ट्यांबाबतच्या चौकशीत आणखी काही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पोलिस सूत्रांनुसार, सलील डोलाचा उजवा हात असलेला मोहम्मद सलीम सुहेल शेख याने मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी सेल (एएनसी) ने केलेल्या चौकशीत खुलासा केला की, २०२० ते २०२३ दरम्यान डी-गँगने दुबईमध्ये पाच आणि मुंबईत दोन ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्या होत्या. या पार्ट्यांमध्ये श्रद्धा कपूर, सिद्धार्थ कपूर, नोरा फतेही, रॅपर लोका, डीजे ओरी उर्फ ​​ओरहान, अब्बास मस्तान आणि झिशान सिद्दीकी यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (Crime News)

(हेही वाचा – Kalyan – Dombivli : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धांचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग)

सूत्रांकडून दिलेल्या माहिती वरून असेही लक्षात येते की, या पार्ट्यांमध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूड आणि राजकीय व्यक्ती आणि इतर हाय-प्रोफाइल व्यक्तींनी फक्त वेगवेगळे ड्रग्ज घेतले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुंबईत आयोजित केलेल्या दोन्ही ड्रग्ज पार्ट्यांच्या ठिकाणांची चौकशी केली जात आहे आणि सलीम शेखचीही या संदर्भात चौकशी केली जात आहे. या प्रकरणात ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना अद्याप समन्स पाठवण्यात आलेले नाहीत, परंतु प्रक्रिया सुरू आहे. लवकरच सर्वांना चौकशीसाठी बोलावले जाईल. आतापर्यंतच्या तपासात दुबई आणि मुंबईत ड्रग्ज पार्टी झाल्याचे उघड झाले आहे. (Crime News)

(हेही वाचा – BJP :  एकेकाळी केंद्रीय मंत्रि‍पद भूषविलेल्या नेत्याची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी)

सूत्रांनुसार, आरोपी सलीम शेखने पोलिस चौकशीत असेही सांगितले आहे की दुबई आणि मुंबईतील सर्व ड्रग्ज पार्टी दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि त्याची बहीण हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने आयोजित केल्या होत्या. अलीशाह पारकरच्या निर्देशानुसार आणि सलीम डोलाच्या सांगण्यावरून सलीम शेख या पार्ट्यांना चरस, एमडी, कोकेन, चरस आणि इतर अनेक ड्रग्ज पुरवत असे. दुबईतील वास्तव्यादरम्यान, त्याने तेथे आयोजित पार्ट्यांमध्येही ही ड्रग्ज पुरवली. सूत्रांनुसार, अलीशाह पारकरच्या निमंत्रणा वरून बॉलिवूड आणि राजकारणातील सेलिब्रिटी या पार्ट्यांना उपस्थित राहिले. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात दुबई आणि मुंबई तसेच इतर ठिकाणी ड्रग्ज पार्टी झाल्याचे पुरावे उघड झाले आहेत. तथापि, या घटनांबाबत पुरावे गोळा करण्याची आणि पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटच्या पुरवठा फरार आरोपी मोहम्मद मुस्तफा ख्वाजा शेख उर्फ ​​रे आणि गोविंद पिरामसिंग सुनार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही तपासात उघड झाले आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.