
-
कल्याण, प्रतिनिधी
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस विद्युत व यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आदिवासी जीवनावर आधारित आयोजित केलेल्या रांगोळीसह अन्य स्पर्धांना शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Kalyan – Dombivli)

(हेही वाचा – TCS Valuation Dip : टीसीएसचं मूल्यांकन ४.५ लाख कोटींनी घसरले , ही कंपनी आता सगळ्यात मौल्यवान टेक कंपनी)
यावेळी उपस्थित कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, तसेच समाज बांधव व नागरिकांनी देखील भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालय आणि शाळांमध्ये देखील भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये जनजाती गौरव पंधरवड्यानिमित्त अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामधे डोंबिवलीतील प्रगती कनिष्ठ महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी जीवनावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. (Kalyan – Dombivli)

(हेही वाचा – 20 वर्षे मुख्यमंत्री… पण कधीच निवडणूक नाही! Nitish Kumar यांचा हा ‘गेमप्लॅन’ नेमका काय?)
तसेच आदिवासी लोकनेते याविषयावर आधारित माहिती पटाचे सादरीकरण, प्रदर्शन आणि वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर कल्याण पश्चिमेतील कॅ. रविंद्र माधव ओक हायस्कूलमध्ये भगवान बिरसा मुंडा जन्म शताब्दी निमित्त १ ते १५ नोव्हेंबर या पंधरवड्यात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रातील इतर शाळांनी देखील या पंधरवड्यात आदिवासी लोकनृत्य, चित्रकला स्पर्धा, इतिहास कलाकृती आणि संस्कृती प्रदर्शन, तारपा नृत्य, आदिवासी खाद्य पदार्थ प्रदर्शन, वारली पेंटिंग, रांगोळी प्रदर्शन अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. (Kalyan – Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
