Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकी(Bihar Assembly Election)चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. भाजपाकडून राज्यात मोर्चेबांधणी करण्यात येत असून आता राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे.(Bihar Assembly Election) जनता दल(युनायटेड)चे सर्वेसर्वा व राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षातील माजी खासदाराने साथ सोडली आहे.(Bihar Assembly Election)
दरम्यान, २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी जदयू नेते संतोष कुशवाहा यांनी पक्ष सोडून राष्ट्रीय जनता दल(आरजेडी)मध्ये प्रवेश केला आहे. पक्षात दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सीमांचलच्या राजकारणात कुशवाहांचा प्रभाव असून त्यांच्या या निर्णयामुळे जेडीयूला नुकसान होऊ शकते. राजद कुशवाहा व्होट बँक आकर्षित करण्यासाठी ही एक रणनीती म्हणून विचार करत आहे. या घडामोडीमुळे बिहारमधील राजकीय घडामोडी बदलू शकतात.(Bihar Assembly Election)
(हेही वाचा ‘Pakistan ला क्षेपणास्त्रं’ हा बनाव! अमेरिकेने दिलं स्पष्टीकरण )
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला, जेडीयूला मोठा धक्का बसला आहे. पूर्णियाचे माजी खासदार आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते संतोष कुशवाह यांनी १० ऑक्टोबरला दुपारी २ वाजता जेडीयूचा राजीनामा देऊन राष्ट्रीय जनता दलात आरजेडी) प्रवेश केला आहे.(Bihar Assembly Election)
संतोष कुशवाहा यांच्या राजदमध्ये जाण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. पक्षातील दुर्लक्ष आणि तिकीट वाटपात उदासीनता यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, असे म्हटले जात आहे. जेडीयू मंत्री लेशी सिंह यांच्या विरोधात धामदहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा सुरू राजकीय वर्तुळात सुरू आहे.(Bihar Assembly Election)
कोण आहेत संतोष कुशवाहा?
संतोष कुशवाहा हे कुशवाहा-कुर्मी समुदायाचे असून सीमांचलच्या राजकारणात त्यांचा बराच प्रभाव आहे. त्यांनी पूर्णिया येथून दोनदा (२०१४ आणि २०१९) जेडीयूचे खासदार म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा आरजेडीमध्ये झालेला प्रवेश हे सीमांचलमधील जेडीयूसाठी मोठे संघटनात्मक नुकसान मानले जात आहे. आरजेडी या हालचालीकडे त्यांच्या सोशल इंजिनिअरिंग स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून पाहत आहे, ज्यामुळे कुशवाहा व्होट बँकेवरील त्यांची पकड मजबूत होऊ शकते. एलजेपी(रामविलास) पक्षाचे नेते अजय कुशवाहा हे देखील आरजेडीमध्ये प्रवेश करण्या्ची शक्यता असून कुशवाहा समुदायावरील पक्षाची पकड आणखी मजबूत होईल.
Join Our WhatsApp Community

