Sakshi Bhojanalaya : शाकाहारी भोजनासाठी समृद्धी महामार्गावरील हक्काचे ठिकाण, जालन्यातील साक्षी भोजनालय

127
साक्षी भोजनालयाचा साइनबोर्ड समृद्धी महामार्गावर
Sakshi Bhojanalaya : शाकाहारी भोजनासाठी समृद्धी महामार्गावरील हक्काचे ठिकाण, जालन्यातील साक्षी भोजनालय

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरलेला समृद्धी महामार्ग मराठवाडा आणि विदर्भासाठी वरदानच ठरला आहे. हजारो प्रवासी, मालवाहतूकदार हे या मार्गाने प्रवास करत असतात. परंतु या महामार्गावरुन प्रवास करत असताना, खाण्यापिण्यासाठी चांगली हॉटेल्स, ढाबे उपलब्ध नसल्याची तक्रार कायम होत असते. काही अन्यधर्मीयांच्या हॉटेल्समध्ये गैरसोय होत असल्याच्याही तक्रारी समाजमाध्यमांवर फिरत होत्या. अशातच जालन्यातील पेट्रोल पंपाजवळ साक्षी भोजनालय (Sakshi Bhojanalaya) हा अशा प्रवाशांसाठी उत्तम पर्याय आहे.

(हेही वाचा – ‘वीर’ शब्दावरून Rahul Gandhi यांच्या अडचणीत वाढ ? इंदिरा गांधींच्या पत्राने वाढवली खळबळ)

या हॉटेलमध्ये अस्सल गावरान पदार्थ मिळतात. विदर्भ – मराठवाड्याचे शेवभाजी, शेवगा मसाला यांसारखे पदार्थ ताजे बनवून मिळतात. जालन्याजवळ प्रवाशांच्या अतिशय सोईच्या ठिकाणी हे हॉटेल असल्याने ग्राहकांची वर्दळ कायम असते. संजय गजर पाटील यांनी अवघ्या दहा महिन्यांपूर्वी सुरु केलेले हे हॉटेल (Sakshi Bhojanalaya) अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.