अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नाही तर ‘या’ आयर्न लेडीला मिळाला शांततेचा Nobel Prize

125
Maria Corina Machado speaking at the World Economic Forum.
Maria Corina Machado addresses the audience at the World Economic Forum.

नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado) यांना, व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize 2025) जाहीर केला आहे. ओस्लो येथे शुक्रवारी विजेत्याच्या घोषणा करण्यात आली. नॉर्वेजियन नोबेल समितीने सादर केलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी यावर्षी ३३८ नामांकने मिळाली होती, ज्यामध्ये २४४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश होता. (Nobel Prize)

(हेही वाचा – BJP चा ‘छठ’वर डोळा ! उत्तर भारतीय मतदारांसाठी मोठी मोर्चेबांधणी)

या घोषणेमुळे, गेल्या काही दिवसांपासून शांततेचा नोबेल पुररस्कारासाठी आपला दावा मांडत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो (Nobel Peace Prize Winner Maria Corina Machado) यांनी गेल्या वर्षभर लपून राहण्यास भाग पाडले गेले असूनही त्यांचा संघर्ष सुरूच ठेवला. “तिच्या जीवाला गंभीर धोका असूनही, ती देशातच राहिली. तिची निवड लाखो लोकांना प्रेरणा देईल,” असे नोबेल समितीने म्हटले आहे.

कोण आहेत मारिया कोरिना मचाडो?
मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलातील लोकांच्या लोकशाही अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून न्यायपूर्ण, शांततापूर्ण लोकशाही संक्रमण घडवण्यासाठी केलेल्या त्यांच्या धाडसी कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘व्हेनेझुएलाची आयर्न लेडी’ (Venezuelan Iron Lady) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado) यांचा हुकुमशाहीविरुद्धचा संघर्ष अनेक दशके जुना आहे. देशातील संकटाच्या काळात त्यांनी लोकशाहीचा निर्भयपणे पुरस्कार केला. धाडसी आणि निर्भय नेत्या अशी त्यांची ओळख आहे.

(हेही वाचा – पद्मविभूषण Ratan Tata यांच्या स्मृतींचा डोंबिवलीत जागर)

व्हेनेझुएलाचे विद्यमान अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी मागील दोन निवडणुकीत दडपशाहीच्या जोरावर विजय मिळवला असा मचाडो यांचा आरोप आहे. त्यांच्या या आरोपांना अमेरिकेनंही पाठिंबा दिलाय. मादुरो यांनी निवडणूक जिंकल्याचे घोषित केल्यानंतर माचाडो यांनी माघार घेण्यास नकार दिला. परिणामी, त्या १४ महिन्यांहून अधिक काळ भूमिगत आहेत. 

अपात्रता, धमक्या आणि जबरदस्तीने गप्प केले जात असतानाही, मचाडो यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे. त्या मुक्त निवडणुका व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना एकत्र करत मानवी हक्कासाठी आवाज उठवण्याचं काम क्यांनीकेलं आहे. व्हेनेझुएला सरकारने राजकीय हक्कांवर निर्बंध आणले आहेत. तसंच विरोधकांच्या उमेदवारांना बेकायदेशीरपणे अपात्र ठरवले. या क्रूर दडपशाहीच्या विरोधात भूमिगत राहूनही मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचे काम सुरुच ठेवले. मुक्त निवडणुका, कायद्याचे राज्य यासाठी त्या लढा देत आहेत. त्यांच्या याच कार्याचा गौरव नोबल शांतता पुरस्कार देणाऱ्या निवड समितीनं केला आहे.

(हेही वाचा – Google Investment in India : गुगलची भारतात ८८,००० कोटींची गुंतवणूक; कुठे कुठे गुंतवणार पैसे ?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.