Aurangzeb : असदुद्दीन ओवैसींच्या भाषणात औरंग्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; भाजपाकडून उद्धव ठाकरेंना सवाल

134

बुलडाण्यात असुदुद्दीन ओवेसींच्या भाषणावेळी औरंग्याच्या समर्थनात घोषणा देण्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाळनकुळे यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

या प्रकरणी चंद्रशेखर बाळनकुळे ट्वीट केले, त्यात ते म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या मातीत औरंग्याचा उदोउदो करणारी अवलाद पुन्हा डोकं वर काढत आहे. बुलडाण्यात असुदुद्दीन ओवेसींच्या भाषणावेळी औरंग्याच्या समर्थनात घोषणा देण्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. सरकारनं सत्य तपासून कारवाई करावी आणि दोषींना धडा शिकवावा. यापूर्वीही प्रकाश आंबेडकर औरंग्याच्या कबरीवर माथा टेकवून आले; पण हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले आहेत. आता किमान ओवेसीच्या सभेतील औरंग्याच्या घोषणांचा उद्धव ठाकरे निषेध करणार आहेत की बाटगी भूमिका घेणार आहेत?

(हेही वाचा Mumbai Monsoon : मुंबईत मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाने दिल्या खबरदारीच्या सूचना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.