Arunachal Pradesh : ‘अरुणालच प्रदेश आमचाच’; चीनचा पुन्हा एकदा ‘हस्यास्पद’ दावा

अरुणाचल प्रदेशवरील आपला दावा चीनने पुन्हा एकदा मांडण्याची ही एका महिन्यातली चौथी वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ मार्च रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यानंतर भारताने अशा हालचाली टाळाव्यात, असे म्हणत बीजिंगने निषेध केला होता.

112
Arunachal Pradesh : 'अरुणालच प्रदेश आमचाच'; चीनचा पुन्हा एकदा 'हस्यास्पद' दावा

भारत ज्याला अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) म्हणतो तो आपला प्रदेश असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनचा दावा आहे की जांगनान हा नेहमीच चीनचा प्रदेश राहिला आहे. जिंगनानवर चीनचा प्रभावी प्रशासकीय अधिकार आहे. हे एक मूलभूत सत्य आहे जे नाकारता येत नाही. या प्रदेशावर भारताचा बेकायदेशीर कब्जा आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी ही माहिती दिली. परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली.

(हेही वाचा – Kangana Ranaut : काँग्रेसची कंगना राणौतवर अश्लील टिप्पणी; राष्ट्रीय महिला आयोगाचे निवडणूक आयोगाला पत्र)

यावर अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हा भारताचाच अविभाज्य भाग आहे आणि चीनचा हा दावा पूर्णपणे निराधार,खोटा आणि हास्यापद आहे असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले.

चीनची ठाम भूमिका :

१९८७ मध्ये भारताने चीनच्या भूभागावर कब्जा केला आणि तथाकथित अरुणाचल प्रदेशची (Arunachal Pradesh) स्थापना केली. या संपूर्ण भागावर भारताने बेकायदेशीरपणे कब्जा केला होता आणि चीनने ताबडतोब त्याच्या विरोधात निवेदन जारी केले होते. भारताचे हे पाऊल बेकायदेशीर आणि अवैध असल्याचा दावा चीनने केला होता. चीनने त्यावेळी हे सांगितले होते आणि आजही या मुद्द्यावर बीजिंगची भूमिका बदललेली नाही.”

(हेही वाचा – Mumbai Crime : पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून १लाखात विकले, चार महिलांना अटक)

भारत – चीनमधील सीमा कधीच निश्चित करण्यात आलेली नाही :

भारताच्या बेकायदेशीर ताब्यात जाण्यापूर्वी अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हा नेहमीच चीनचा भाग होता, असे सांगून लिन म्हणाले की, भारत आणि चीनमधील सीमा कधीच निश्चित करण्यात आलेली नाही. अरुणाचल प्रदेशवरील आपला दावा चीनने पुन्हा एकदा मांडण्याची ही एका महिन्यातली चौथी वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ मार्च रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यानंतर भारताने अशा हालचाली टाळाव्यात, असे म्हणत बीजिंगने निषेध केला होता.

(हेही वाचा – Sangli Drugs : सांगलीत १५० कोटी रुपयांचे एमडी-ड्रग्ज जप्त; मुंबई पोलिसांचा कवठेमहांकाळ येथे छापा)

परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा दावा फेटाळला :

अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. आपला दावा बळकट करण्यासाठी, भारतीय नेत्यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यांवर चीन सातत्याने आक्षेप घेत आला आहे. मात्र, चीनने सातत्याने भारताचे दावे फेटाळले आहेत. यावेळीही पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) दौऱ्यानंतर चीनने यावर आक्षेप घेतला आहे. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नंतर चीनचा दावा ‘निरर्थक’ आणि ‘हस्यास्पद’ म्हणून फेटाळला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.