Larry Page : Google Guys म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन उद्योजक लॅरी पेज

Larry Page : लॅरी पेज यांना मिशिगन विद्यापीठाकडून २ मे २००९ रोजी मानद डॉक्टरेट मिळाली. २००९ मध्ये ते फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत २६ व्या क्रमांकावर होते आणि युनायटेड स्टेट्समधील ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.

100
Larry Page : Google Guys म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन उद्योजक लॅरी पेज
Larry Page : Google Guys म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन उद्योजक लॅरी पेज

लॅरी पेज (Larry Page) यांचा जन्म मिशिगनच्या ईस्ट लॅन्सिंग येथील एका ज्यू कुटुंबात २६ मार्च १९७३ रोजी झाला. त्यांचे वडील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संगणक विज्ञानाचे प्राध्यापक होते. एका मुलाखतीदरम्यान पेज म्हणाले की, त्यांचे घर अस्ताव्यस्त असायचे, संगणक आणि लोकप्रिय विज्ञान मासिके सर्वत्र विखुरलेली असायची. वयाच्या सहाव्या वर्षी ते आजूबाजूला पसरलेल्या वस्तूंसह खेळायला लागले, तेव्हा त्यांना संगणकाविषयी आकर्षण वाटू लागले. विशेष म्हणजे तो वर्ड प्रोसेसरसह असाइनमेंट पूर्ण करणारा त्याच्या प्राथमिक शाळेतील पहिला मुलगा होता.

(हेही वाचा – Holi : मुंबईसह तीन शहरात होळी निमित्त वाहन चालकांवर कारवाई )

२००१ मध्ये झाले Google चे चेअरमन

अगदी लहानपणापासूनच, त्यांना समजले की, त्यांना गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांना तंत्रज्ञान आणि व्यवसायात रस वाटू लागला. त्यामुळे ते साधारण १२ वर्षांचे असताना, त्यांना माहीत होते की, त्यांना एक कंपनी सुरु करायची आहे. विशेष म्हणजे पुढे जाऊन त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करून दाखवली. १९९८ मध्ये, ब्रिन आणि पेज यांनी Google Inc ची स्थापना केली. २००१ मध्ये Google चे चेअरमन आणि सीईओ म्हणून एरिक श्मिट विराजमान होण्यापूर्वी, पेज यांनी ब्रिनसोबत Google चे सह-अध्यक्ष म्हणून काम केले.

२००४ मध्ये मिळाला मार्कोनी फाउंडेशन पुरस्कार

२००३ मध्ये, ब्रिन आणि पेज या दोघांनाही आयई बिझनेस स्कूलने “उद्योजकतेचा उपयोग करून नवीन व्यवसायांच्या निर्मितीला चालना दिल्याबद्दल…” मानद एमबीए पदवी प्रदान केली. २००४ मध्ये, त्यांना मार्कोनी फाउंडेशन पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार “अभियांत्रिकीमधील सर्वोच्च पुरस्कार” मानला जातो आणि त्यांना कोलंबिया विद्यापिठात मार्कोनी फाउंडेशन फेलो म्हणून निवडले गेले. २००५ मध्ये, ब्रिन आणि पेज यांना अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्य म्हणून निवडले गेले.

फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत २६ व्या क्रमांकावर

लॅरी पेज यांना मिशिगन विद्यापीठाकडून २ मे २००९ रोजी मानद डॉक्टरेट मिळाली. २००९ मध्ये ते फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत २६ व्या क्रमांकावर होते आणि युनायटेड स्टेट्समधील ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्याचबरोबर २००९ मध्ये, ब्रिन आणि पेज फोर्ब्सच्या “जगातील सर्वात शक्तिशाली लोक” मध्ये पाचव्या क्रमांकावर होते. लहानपणी पाहिलेले स्वप्न लॅरी पेज यांनी “Google Guys” होऊन पूर्ण केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.