Jammu and Kashmir : कलम 370 हटवल्याचा आणखी एक फायदा; श्रीनगरमध्ये 33 वर्षांनंतर आर्य समाजाची शाळा सुरु

195

जम्मू काश्मीरमधून (Jammu and Kashmir) 370 कलम हटविल्यानंतर तेथे गुंतवणुकीपासून ते सामाजिक बदलांपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या चर्चेला येत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे श्रीनगरमध्ये 1990च्या दशकातील दहशतवादाच्या काळात बंद पडलेले आर्य समाज स्कूल तब्बल 33 वर्षांनंतर पुन्हा सुरू झाले आहे. या शाळेत सुमारे 50 विद्यार्थ्यांना आर्य समाज संस्था जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रशासनाच्या प्रोत्साहनाने मोफत शिक्षण देत आहे.

1990 च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला असताना आर्य समाज स्कूल बंद करावे लागले होते. तेथे एका दहशतवादी संघटनेच्या समर्थकाने ते स्कूल ताब्यात घेऊन तिथे स्वतःचे प्रशिक्षण वर्ग चालविले होते. पण आर्य समाज संस्थेने मोठी न्यायालयीन लढाई लढत या शाळेचा ताबा पुन्हा मिळवला आणि काश्मीरमधून (Jammu and Kashmir) 370 कलम हटविल्यानंतर 2023 मध्ये ही शाळा पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या सुमारे 50 विद्यार्थी तिथे मोफत शिक्षण घेत असून ते प्रामुख्याने ही शाळा असलेल्या सराफा कदल भागातलेच आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मूळच्या लखनऊच्या असून आर्य समाज संस्थेचे प्रमुख अरुण चौधरी यांच्या पुढाकाराने आणि प्रोत्साहनाने त्या इथे काम करत आहेत. शाळेतील काही विद्यार्थ्यांचे पालक दरमहा 500 रुपयांची संस्थेला मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तब्बल 33 वर्षानंतर आर्य समाज स्कूल पुन्हा सुरू करणे हे मोठे आव्हान होते. परंतु, स्थानिक पालकांची बोलल्यानंतर त्यांनी सहकार्याची तयारी दाखविली. सुरक्षिततेची हमी घेतली आणि त्यानंतर आपले पाल्य शाळेत पाठवायला ते तयार झाले. जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सध्या जे सकारात्मक बदल होत आहेत, त्यापैकी आर्य समाज स्कूल पुन्हा सुरू होणे हा फार महत्त्वाचा बदल घडलेला दिसतो आहे.

(हेही वाचा Shri Ram Mandir : बाळासाहेबांचा मुलगा असे वक्त्यव्य करतो, ही लज्जास्पद बाब; श्रीराम मंदिरावरून उद्धव ठाकरेंच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.