Security Of Rammandir : रामजन्मभूमी परिसराची सुरक्षाव्यवस्था विशेष सुरक्षा दलाकडे सोपवणार

121
Security Of Rammandir : रामजन्मभूमी परिसराची सुरक्षाव्यवस्था विशेष सुरक्षा दलाकडे सोपवणार
Security Of Rammandir : रामजन्मभूमी परिसराची सुरक्षाव्यवस्था विशेष सुरक्षा दलाकडे सोपवणार

अयोध्येतील रामजन्मभूमीवरील राममंदिराचे भव्य बांधकाम चालू आहे. (Security Of Rammandir) जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. यापूर्वी अयोध्येतील रामजन्मभूमी  परिसराची सुरक्षाव्यवस्था उत्तर प्रदेशच्या विशेष सुरक्षा दल एसएसएफकडे सोपवली जाणार आहे. रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी २८० एसएसएफ जवान तैनात करण्यात येणार आहेत. अयोध्येशिवाय काशी आणि मथुरेतील मंदिरांच्या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी एसएसएफला दिली जाऊ शकते.

(हेही वाचा – Skill Development Department : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून दीड वर्षांत तीन लाख तरुणांना रोजगार)

मंदिराच्या विशेष सुरक्षेसाठी यूपी सरकारने एसएसएफची स्थापना केली आहे आणि त्यात यूपी पोलीस आणि पीएसीचे कर्मचारी समाविष्ट आहेत.  ११ सप्टेंबरच्या रात्री एसएसएफच्या २ बटालियनही अयोध्येत पोहोचल्या आहेत. तैनातीपूर्वी त्यांना एक आठवड्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. रामजन्मभूमी परिसराच्या सुरक्षेसाठी पीएसीच्या १२ कंपन्या कार्यरत आहेत. सीआरपीएफ रामलल्लाच्या मंदिराच्या आतल्या भागाचे रक्षण करते. सध्या येथे सीआरपीएफच्या ६ बटालियन तैनात आहेत, ज्यात महिला बटालियनचाही समावेश आहे. मंदिराच्या बाहेरील भागात आणि चेकिंग पॉइंटवर सिव्हिल पोलिसांचे पुरुष आणि  महिला पोलीस तैनात आहेत. (Security Of Rammandir)

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषदेची तयारी

नुकतीच अयोध्येत विश्व हिंदू परिषदेची २ दिवसीय बैठक सुरू झाली. या वेळी विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, श्री रामजन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विहिंप जगभर आनंदोत्सव म्हणून साजरा करेल. या वेळी देशभरातून एक लाखाहून अधिक साधू-संतांना आमंत्रित केले जाणार आहे. विहिंप त्यांच्या भोजन आणि निवासाची काळजी घेईल. यासोबतच अयोध्येत सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विहिंप मोफत स्वयंपाकघरही चालवणार आहे.अभिषेक सोहळ्यापूर्वी बजरंग दल ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत २२८१ शौर्य यात्रा काढेल आणि देशातील पाच लाखांहून अधिक गावांना जोडेल. या यात्रेदरम्यान यात्रा मार्गांवर धार्मिक सभांचेही आयोजन करण्यात येणार आहे. अभिषेक सोहळ्याच्या दिवशी देशभरातील मठ आणि मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ, हवन आणि आरती केली जाईल. याशिवाय रामभक्त रात्रीच्या वेळी प्रत्येक घरात ५ दिवे नक्कीच लावतील आणि करोडो भाविकांना प्रसादाचे वाटपही केले जाईल. (Security Of Rammandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.