Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी १ ऑक्टोबरला लंडनमध्ये करार

सांस्कृतिक मंत्रालयाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली

23
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी १ ऑक्टोबरला लंडनमध्ये करार
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी १ ऑक्टोबरला लंडनमध्ये करार

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांच्या माध्यमातून अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघनखे लवकरच भारतात आणली जाणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने एक ट्वीट करून याबाबत माहिती देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहेत.

भारतातील अनेक ऐतिहासिक वस्तू ब्रिटनच्या संग्रहालयात आहेत. त्या भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात आता भारताला यश मिळत असून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत येणार आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित दुर्मिळ कलाकृती युनायटेड किंगडममधून परत आणण्यात येणार’, असे ट्वीट केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने केले आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, “ऐतिहासिक वारसा असलेल्या आमच्या मौल्यवान कलाकृती परत येणे हा भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा मोठा विजय आहे.” “आमचा गौरवशाली वारसा परत येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रसिद्ध ‘वाघनखे’ त्याच्या विजयी पुनरागमनासाठी सज्ज असल्याने इतिहासाची निर्मिती पाहण्यासाठी सज्ज व्हा,” मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मंत्रालयाने ‘इंडिया रिक्लेम इट हिस्ट्री’ या टॅगलाइनसह एक पोस्टर देखील शेअर केले आहे.

(हेही वाचा – Hawker Policy : फेरीवाला धोरणाचा अर्थ कुठेही व्यवसाय करावा किंवा दुकान थाटावे असा नाही; उच्च न्यायालयाने फटकारले )

छत्रपती शिवाजी महाराजांनी याच वाघनखांचा वापर करून अफझलखानला पराभूत केले होते, असे या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, १ ऑक्टोबरला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि इतर अधिकारी लंडनला जाऊन वाघनखे भारतात परत आणण्यासाठी सामंजस्य करार करणार आहेत. सध्या ते ब्रिटनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

९ वर्षांत २०० हून अधिक कलाकृती परत आल्या

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ९ वर्षांत विविध देशांमधून सुमारे २४० प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या आहेत. यासोबतच अशा ७२ कलाकृती त्यांच्या देशाला परत देण्यात येणार आहेत. परत आणलेल्या शेकडो कलाकृतींमध्ये नटराजाची ११०० वर्षे जुनी मूर्ती आणि नालंदा संग्रहालयातून सुमारे सहा दशकांपूर्वी गायब झालेली १२ व्या शतकातील बुद्धाची कांस्य मूर्ती यांचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.