Amit Shah: आरक्षण हटवणार नाही ही मोदीची गॅरंटी: अमित शाह

75
Amit Shah यांच्या भाषणाचा बनावट व्हिडियो व्हायरल, भाजपा नेत्यांकडून दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल
Amit Shah यांच्या भाषणाचा बनावट व्हिडियो व्हायरल, भाजपा नेत्यांकडून दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल

अकोल्याचे महायुतीचे उमेदवार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची आज अकोल्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. काँग्रेसकडून चुकीचा प्रचार केला जातोय. भाजप संविधान बदलणार नाही. तसेच SC, ST आणि OBC आरक्षणाला कुणीही हात लावणार नाही, असं अमित शाह (Amit Shah) म्हणाले. “जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत या देशातून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कुणीही हटवू शकत नाही. ही मोदींची गॅरंटी आहे.” असं अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले आहेत. (Amit Shah)

(हेही वाचा –Devendra Fadnavis: तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल)

अमित शाह (Amit Shah) यांनी यावेळी कलम ३७० वरुनही काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी अमित शाह यांनी अकोल्याच्या नागरिकांना महायुतीचे उमेदवार संजय धोत्रे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच भाजपकडून काय-काय कामे करण्यात आली, याबाबतची माहिती अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या भाषणातून दिली.

ना काँग्रेसला येऊ देणार, ना ट्रिपल तलाकला येऊ देणार

“ट्रिपल तलाक हटवलं पाहिजे की नको? पण काँग्रेस पक्ष म्हणतो, ते वापस आले तर ट्रिपल तलाक घेऊन येणार. मी आज अकोल्यावाल्यांना सांगू इच्छितो, ना काँग्रेसला येऊ देणार, ना ट्रिपल तलाकला येऊ देणार. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू, बौद्ध, शीख, जैन आमच्या सर्व बंधूंवर अत्याचार झाले. महिला, मुलींवर बलात्कार करण्यात आला. त्यांना सुरक्षा द्यायची की नाही? ते भारताच्या शरणात आले. मोदी सरकारने हिंदू, बौद्ध, शीख, जैन आमच्या शरणार्थी बंधूंना नागरिकता देण्याचं काम केलं. काँग्रेस म्हणतं आम्ही सीएए रद्द करणार. जोपर्यंत भाजपचा एक छोटा मुलगाही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही सीएएला हात लाऊ देणार नाही.” असं अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत आरक्षण कुणीही हटवू शकत नाही

“काँग्रेस पक्ष खोटं पसरवत आहे की, भाजपला ४०० जागांवर विजय मिळाला तर आरक्षण जाईल. अरे काँग्रेसवाल्यांनो, आम्हाला संविधान बदलण्याची ताकद या देशाच्या जनतेने १० वर्षांपासून दिली आहे. जनतेने २०१४ मध्ये पूर्ण बहुमत दिलं, २०१९ मध्ये देखील दिलं. आम्ही आरक्षण हटवलं नाही. आम्ही काय हटवलं? आम्ही पूर्ण बहुमताचा उपयोग तीन तलाक हटवण्यासाठी केला. कलम ३७० हटवण्यासाठी केला. दहशतवाद संपविण्यासाठी केला. सीएए आणण्यासाठी केला. अकोल्याच्या नागरिकांना मी आज मोदीजींची गॅरंटी म्हणून सांगून जातो, जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत या देशातून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कुणीही हटवू शकत नाही. ही मोदींची गॅरंटी आहे.” असं आश्वासन अमित शाह (Amit Shah) यांनी दिलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.