Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या जागेचा घोळ कायम; दावा सोडला नसल्याची राष्ट्रवादीची माहिती

भुजबळ यांच्या माघारीमुळे शिंदे गटाच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी भाजपानेही नाशिकच्या जागेवर दावा सांगितला आहे.

107
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पसंतीचे उमेदवार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीतून माघार घेतल्याने महायुतीत नाशिकची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जाईल, अशी चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी नाशिकच्या जागेवरचा दावा सोडला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेचा घोळ कायम आहे. (Lok Sabha Election 2024)

छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिकचा पेच सुटून महायुतीकडून लगेच उमेदवार जाहीर होईल, अशी चर्चा होती. मात्र, चार दिवस उलटल्यानंतरही नाशिकच्या जागेचा संभ्रम कायम आहे. भुजबळ यांच्या माघारीमुळे शिंदे गटाच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी भाजपानेही नाशिकच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीत नाशिकवरून जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Viral Video: नवरदेवाचे बूट चोरले म्हणून भर मंडपात मारामारी, पाच जण जखमी)

आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

या पार्श्वभूमीवर मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी, छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभेवरील दावा सोडलेला नसल्याचे स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024)

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे तर २००९ मध्ये समीर भुजबळ निवडून गेले होते. सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे तीन आमदार असून येथे पक्षाची ताकद आहे. त्यामुळे आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम आहे, असे परांजपे यांनी सांगितले. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे असला तरी याबदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभेची एक अतिरिक्त जागा देण्याचा समझोता झाल्याची माहिती त्यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.