Hanuman Jayanti 2024 : हनुमान जन्मस्थळ अंजनेरी देवस्थान भावी पिढीसाठी प्रेरणादायी; महंत आचार्य पीठाधीश्वर डाॅ. अनिकेत शास्त्री महाराज

287

मंगळवार, २३ एप्रिल रोजी देशभरात हनुमान जयंती (Hanuman Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी झाली. हनुमान जन्मस्थळ नाशिक येथील अंजनेरी देवस्थान येथे लाखो भाविकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी मंदिर, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी भक्तांची उत्तम सोय केली. हनुमान जन्मस्थळ अंजनेरी देवस्थान हे भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास महंत आचार्य पीठाधीश्वर डाॅ. अनिकेत शास्त्री महाराज यांनी यावेळी व्यक्त केला.

(हेही वाचा Vehicle Parking : मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरच वाहन चालकांची लूट; विनामूल्य पार्किंगतळावर पार्किंग माफियांचा कब्जा )

अंजनेरी देवस्थान धर्म संस्कृतीचे केंद्र बनेल

मंगळवार, २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti)  दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून दीड लाखांच्या वर भक्तांनी अंजनेरी पर्वत या हनुमान जन्मस्थळाला हजेरी लावली. त्या सर्व भाविकांना हनुमान चालिसा, लाडू, पाणी बाॅटल, ताक, सरबत आदींचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळी जन्मोत्सवाच्या निमित्ताने महायज्ञ संपन्न झाला. सामूहिक हनुमान चालिसा पठण आणि महाआरती संपन्न झाली. अखिल भारतीय संत समिती, अखाडा परिषद, समस्त संत समाज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी आणि अंजनेरी ग्रामस्थ या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती. या ठिकाणी भक्तांची उत्तम सोय करण्यात आली. येथील उत्सवाच्या वेळी पोलीस प्रशासन, वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिकी स्वराज्य संस्था यांनी उत्तम व्यवस्था केली होती. हनुमान जन्मस्थळ अंजनेरी देवस्थानाच्या पुनर्निमाणामुळे हे देवस्थान येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असेल. हे धर्म संस्कृतीचे केंद्र बनेल. असे महंत आचार्य पीठाधीश्वर डाॅ. अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.