आता वर्षा गायकवाडांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप! कुणी केली तक्रार?

शालेय शिक्षणमंत्री तथा काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याविरेाधात थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

80

महाविकास आघाडीतील एनसीपी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात ईडी, सीबीआयच्या चौकशा सुरु आहेत. त्यामध्ये आता काँग्रेसच्या मंत्र्यांचाही समावेश होत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर आता भूखंड घोटाळा केल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप किरीट सोमय्या यांनी केला नाही, तर खुद्द काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने थेट काँग्रेस हायकमांडकडे केला आहे.

काय आहे प्रकरण? 

शालेय शिक्षणमंत्री तथा काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याविरेाधात थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात गायकवाड यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची योग्य दखल न घेतल्यामुळे ही तक्रार करण्यात आली. थेट हायकमांडकडे तक्रार केल्यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चिनाय आणि एमव्हीएलयू ही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये अनुदानित महाविद्यालये आहेत. या ठिकाणी ८००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. मात्र महाविद्यालयाची ही जागा खासगी बिल्डरांच्या घशात घातली जाणार आहे. यामुळे ही महाविद्यालये वाचविण्यासाठी शर्मा यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे वेळोवेळी महाविद्यालयाची जागा वाचवण्याबाबात मागणी केली होती. मात्र गायकवाड त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे शर्मा यांचे म्हणणे आहे. दरम्यान, थेट सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार गेल्यामुळे वर्षा गायकवाड काय भूमिका घेणार तसेच तक्रारीचे उत्तर मागवण्यात आले तर त्या काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा : ७५ लाख नागरिकांचा ‘लसवंत’ होण्यास नकार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.