Ajit Pawar : अजित पवारांच्या मातोश्रींची इच्छा आणि राजकीय वर्तळात सुरू झाली चर्चा

54

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाकरता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मातोश्री आशा पवार यांनी मतदान केल्यानंतर जे वक्तव्य केले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काटेवाडी ग्रामपंचायतसाठी त्यांनी मतदान केले आणि माध्यमांनी त्यांना गाठले, त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली आणि राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या.

काय म्हणाल्या आशा पवार?

मलाही वाटते की माझ्या हयातीत मुलाने CM व्हावे. पण बघू काय होते, लोकांवर सगळे आहे, त्यांचे प्रेम मिळत आहे. राज्यभर सध्या ग्रामपंचायतीसाठी रविवार, ५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यावेळी बारामतीमध्ये काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान करण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar)आले नाही, परंतु त्यांच्या मातोश्री आशा पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मतदानासाठी आले होते. मतदान केल्यानंतर माध्यमांनी थेट अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांची प्रतिक्रिया घेतली आणि त्यांनी थेट अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाचा विषय छेडला.

(हेही वाचा World Cup 2023 : दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकन संघानेही केला सराव रद्द)

काय म्हणाले मंत्री दीपक केसरकर?

अजित पवार (Ajit Pawar) यांचे वय लहान आहे. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा असणे हे काही गैर नाही. पण शेवटी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात पुढची निवडणूक लढवली जाणार आहे, अजितदादांचे वय लहान आहे त्यांना पुढच्या काळात संधी मिळू शकते, असेही मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.