Women soldiers : मोदींचे महिला सैनिकांना दिवाळी गिफ्ट काय आहे ते जाणून घ्या..

यामुळे महिला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधू शकतील.

53
Women soldiers : मोदींचे महिला सैनिकांना दिवाळी गिफ्ट काय आहे ते जाणून घ्या..
Women soldiers : मोदींचे महिला सैनिकांना दिवाळी गिफ्ट काय आहे ते जाणून घ्या..

केंद्र सरकारने सशस्त्र दलातील महिला जवानांना दिवाळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका ऐतिहासिक प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे, यापुढे भारतीय सैन्यात काम करणाऱ्या महिला सैनिक, सेलर्स, (नौदल) आणि एयर वॉरियर्स (वायुसेना) यांना अधिकाऱ्यांच्या बरोबरीने मातृत्व, बाल संगोपन आणि मूल दत्तक संदर्भात रजा मिळेल. संरक्षण मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये महिला अग्निवीरचाही समावेश आहे. (Women soldiers )

आत्तापर्यंत, लष्करातील केवळ उच्च पदावरील महिला अधिकाऱ्यांना प्रसूती, बाल संगोपन आणि मूल दत्तक घेण्यासाठी रजा दिली जात होती. यामुळे महिला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधू शकतील. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ‘नारी शक्ती’ला स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता तिन्ही सैन्यातील महिला सैनिकांना अधिकार्‍यांना समान रजा देऊन एक आदर्श बदल करण्यात आला आहे. (Women soldiers)

(हेही वाचा :Ajit Pawar : अजित पवारांच्या मातोश्रींची इच्छा आणि राजकीय वर्तळात सुरू झाली चर्चा)

महिला अग्निवीरांच्या भरतीमुळे, देशाच्या जमीन, सागरी आणि हवाई सीमांचे रक्षण करण्यासाठी महिला सैनिक, सेलर्स आणि एयर वॉरियर्स यांच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीमुळे सशस्त्र दल सक्षम होईल. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हा निर्णय सैन्यातील सर्व महिलांच्या सहभागाच्या अनुषंगाने आहे, मग त्यांची श्रेणी काहीही असो नियमांच्या विस्तारामुळे सैन्यात तैनात असलेल्या महिलांना कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यास मोठी मदत होईल. याशिवाय, यामुळे लष्करातील महिलांच्या कामाच्या परिस्थितीतही सुधारणा होईल आणि त्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधू शकतील. सरकारी आकडेवारीनुसार, मार्च २०२३ पर्यंत भारतीय सैन्यात ७हजारांहून अधिक महिला विविध पदांवर तैनात आहेत. यामध्ये लष्करात ६ हजार ९९३ तर नौदलात ७४८ महिला अधिकारी आहेत. वैद्यकीय कर्मचारी वगळता, भारतीय हवाई दलात महिला अधिकाऱ्यांची संख्या १६३६ होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.