नाशिकमध्ये अजित पवार यांचं शक्तिप्रदर्शन

123
नाशिकमध्ये अजित पवार यांचं शक्तिप्रदर्शन

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज म्हणजेच शनिवार १५ जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्याकडे नुकताच अर्थमंत्रीपद आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार यांचं नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत केलं आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्राची संस्कृती एक कोटी कोहिनूर हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार)

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नाशिकमध्ये सभा घेऊन अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता अजित पवार यांच्या आजच्या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच सध्या अजित पवार यांच्या या नाशिक दौऱ्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे.

काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने नाशिकमध्ये दाखल झाले. अजित पवार यांचे मोठ्या जल्लोषात नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. अजित पवार प्रमाणेच शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.