शरद पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर ‘अजित’ दादा नाराज?

141

नातू पार्थ पवारच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही. ते इममॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास असल्याचे शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली असून, नाराज अजित पवार जलसंपदा मंत्री जयंत यांच्यासह सिल्हर ओकवर पोहोचले आहेत. शरद पवारांनी पवार कुटुंबातील एखाद्या सदस्याविषयी पहिल्यांदाच अशी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र पवारांच्या या वक्तव्यांमुळे आता पवारांच्या कुटुंबातच वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले पवार

माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा असे पवार म्हणालेत. दरम्यान शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर पार्थ पवार यांनी मात्र कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असे पार्थ पवार यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.