पार्थ लंबी रेस का घोडा है –  नितेश राणे

119

नातू पार्थ पवारच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही. ते इममॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास असल्याचे शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरणात उलटसुलुट चर्चा निर्माण झाली आहे. त्यातच आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील आगीत तेल ओतले असून, पार्थ लंबी रेस का घोडा है असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे.

नेमकं काय म्हणाले पवार

माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा असे पवार म्हणालेत. दरम्यान शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर पार्थ पवार यांनी मात्र कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असे पार्थ पवार यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.