Ajit Pawar : मराठा आरक्षणावर अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना सुनावले; म्हणाले…

28

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवार, १० सप्टेंबर रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण हे देखील राज्याचे 4 वर्षे मुख्यमंत्री होते. टीका करणे फार सोपे असते. जे कोणी टीका करत आहेत ते कधीना कधी राज्याचे प्रमुख होते. एकमेकावर टोलवाटोलवी करून चालणार नाही. सरकार व विरोधीपक्ष असणाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

काहीजण म्हणतात केंद्रात सत्ता आहे. दहा वर्षे डॉ. मनमोहन सिंग हे देखील सत्तेवर होते ना? मी काही तरी बोलायचे आणि त्यांनी काही तरी बोलायचे असे चालणार नाही. समाजाला न्याय द्यायचा असेल तर सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. आज जे पुढारपण करतायत तसेच विरोधी पक्ष म्हणून जाऊन भेटतायत त्यातील प्रत्येक जणाने महत्वाचे पद उपभोगले आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला. कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याकरिता सत्तेचा वापर केला पाहिजे, ही जी स्व. यशवंतराव चव्हाण यांची शिकवण आहे. त्यांचे कार्य आम्ही पाहत आलेलो आहोत.

(हेही वाचा Devendra Fadanvis : कोणाच्या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्ट करू शकेल – देवेंद्र फडणवीसांनी उदनिधी, स्टालिन यांना सुनावले )

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फटाफुट झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे प्रथमच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर शिरवळ येथे अजित पवार यांचे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि त्यांचेवर जेसीबीमधून फुलांची उधळण केली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, वाई – खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील दौऱ्याचे पूर्णपणे नियोजन केले होते. शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड, सातारा, उंब्रज, कराड या ठिकाणी अजित पवार यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.