Devendra Fadanvis : कोणाच्या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्ट करू शकेल – देवेंद्र फडणवीसांनी उदनिधी, स्टालिन यांना सुनावले 

88

या देशावर ज्‍यांनी आक्रमण केले, ते संपले. पण हिंदू धर्म कधी संपला नाही. कुणाच्‍या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्‍ट करू शकेल. द्रमूकचे नेते उदयनिधी स्‍टॅलिन जर हिंदू धर्म संपविण्‍याची भाषा बोलत असतील, तर त्‍यांना त्‍यांची जागा दाखवावी लागेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांना सुनावले.

हिंदू धर्माला मलेरिया म्हणणाऱ्यांना ठाकरेंची साथ

दुसरीकडे हिंदू धर्माला डेंग्यू, मलेरिया म्‍हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचे वडील एम. के. स्‍टॅलिन यांच्‍या बाजूला माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे बसतात. ते आता कुणाच्‍या सोबत आहेत, हे लोकांना कळले आहे. त्‍यांना आता नक्‍कीच घरी पाठवावे लागेल, असा टोला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी लगावला. ते अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.

अमरावतीला सर्वात जास्त निधी आम्ही दिला

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भगवान श्रीकृष्‍ण हे तर अमरावती जिल्‍ह्याचे जावई आहेत. त्‍यांच्‍या जन्‍मोत्‍सवात आम्‍ही विकासाचा, प्रेमाचा काला घेऊन आलो आहोत. गेल्‍या सत्‍तर वर्षांत जितका निधी अमरावती जिल्‍ह्याला मिळाला नाही, तेवढा निधी आमच्‍या सत्‍ताकाळात मिळाला.

(हेही वाचा Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून आणणार महाराष्ट्रात; सामाजिक कार्यकर्ते विनोद डिसुझा यांच्या प्रयत्नांना यश)

अमरावतीतील प्रस्‍तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ विकास, मेगा टेक्‍सटाईल पार्क, हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विद्यापीठ, रिद्धपुरात मराठी भाषा विद्यापीठ, रस्‍त्‍यांची 2 हजार कोटी रुपयांची कामे हा विकासाचा ओघ असल्‍याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी चित्रपट अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी, अभिनेते राजपाल यादव, खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा आदी उपस्थित होते.

राम, हनुमान अन् शिवराय चालतील

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) म्हणाले की, जरी काही लोकांनी हनुमान चालिसा म्हणणायासाठी नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले. पण त्यांना काही लाभ झाला नाही. परंतू या देशात केवळ भगवान राम चालतील, हनुमानजी चालतील अन् छत्रपती शिवाजी महाराज चालतील. भारत माता की जय असा जयघोष केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, भारत माता म्हणण्यास किती चांगले वाटते. इंडिया माता म्हणणं मनाला चांगल वाटतं का? असा प्रश्न उपस्थित करुन सभेतील लोकांनी त्यास उत्तर दिले नाही नाही…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.