Harbour Railway : हार्बर मार्गावर २२ दिवस रात्रकालीन मेगाब्लॉक

 काही लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार

146
Harbour Railway : हार्बर मार्गावर २२ दिवस रात्रकालीन मेगाब्लॉक
Harbour Railway : हार्बर मार्गावर २२ दिवस रात्रकालीन मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील (Harbour Railway) पनवेल स्थानकावर समर्पित फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी २ ऑक्टोबरपर्यत रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक आणखी २२ दिवस चालणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर उशिरा सुटणाऱ्या काही लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रवाशांना याचा फटका काही दिवस सहन करावा लागणार आहे.

ग्रेटर नोएडातील दादरीपासून ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी सर्वत्र रेल्वे मार्गिका टाकण्याचा प्रकल्प डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन लिमिटेडने हाती घेतला आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून दोन नवीन ट्र्क पनवेल स्टेशन यार्डमधून जाण्याचे नियोजित आहे.

शेवटीची लोकल 

सीएसएमटी-पनवेल शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता

ठाणे-पनवेल शेवटची लोकल रात्री ११.३२ वाजता

पनवेल-ठाणे शेवटची लोकल रात्री १०.१५वाजता

पहिली लोकल 

सीएसएमटी-पनवेल पहिली लोकल पहाटे- ४.३२ वाजता

पनवेल स्थानकातून सीएसएमटीकरिता पहिली लोकल पहाटे ५.४० वाजता

ठाणे-पनवेल पहिली लोकल सकाळी ६.२०वाजता

पनवेल-ठाणे पहिली लोकल पहाटे- ६.१३ वाजता

या लोकल रद्द 

सीएसएमटी-पनवेल रात्री-११.१४, १२.२४,पहाटे-५.१८,सकाळी- ६.४० या लोकल रद्द

पनवेल-सीएसएमटी रात्री- ९.५२,१०.५८, पहाटे-४.०३,५.३१ या लोकल रद्द

ठाणे-पनवेल-नेरुळ रात्री- ९.३६,१२.०५,पहाटे-५,१२,५,४० या लोकल रद्द

पनवेल-ठाणे रात्री -११.१८,पहाटे- ४.३३, ४.५३ या लोकल रद्द

(हेही वाचा :Accident : ठाण्यात मोठी दुर्घटना, इमारतीची लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू)

या लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट

सीएसएमटी-पनवेल रात्री- ११.३०, ११.५२, १२,१३,१२.४० या लोकल बेलापुर पर्यत धावतील आणि तेथूनच सीएसएमटीकडे रवाना होतील.

वडाळा-बेलापुर रात्री १२.५०ची लोकल वाशी पर्यत धावणार

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.