Sanatan Dharm Sabha : सनातन धर्म सभेच्या वतीने वसईत ‘प्रखर राष्ट्रचेतना सभा’; साध्वी प्रज्ञा राहणार उपस्थितीत

20
सनातन धर्म सभेच्या (Sanatan Dharm Sabha) वतीने ८ ऑक्टोबर रोजी साईनगर मैदान, वसई (प.) येथे भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘प्रखर राष्ट्रचेतना सभा’ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व वसई तालुक्यातील हिंदू संघटनांकडून खासदार साध्वी यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून त्यांचे भव्य बाईक रॅली काढून वसईनगरीत स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी त्या पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आयोजक उत्तम कुमार यांनी दिली.
भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर तथा साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळ मतदारसंघातून २०१९ ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लढविली आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध पदार्पणातील निवडणूकीत ३,६४,८२२ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. खासदार प्रज्ञासिंग ठाकूर तथा साध्वी प्रज्ञा एक भारतीय राजकारणी व धर्मगुरू आहे. महाविद्यालयाच्या काळापासून त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सक्रिय सदस्या होत्या आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील झाल्या. प्रखर राष्ट्रचेतना सभा बद्दल अधिक माहितीसाठी उत्तम कुमार यांना मोबाईल क्रमांक ९३२३५ २८१९७ यावर संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.