FIR नंतर ओवैसींना आणखी एक झटका, AIMIM च्या 30 जणांना अटक

ओवेसींच्या पक्ष AIMIM पक्षाच्या 30 जणांवर गुन्हा दाखल

114

प्रक्षोभक वक्तव्य आणि सोशल मीडियावर द्वेशयुक्त संदेश पसरविल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नवी दिल्ली जिल्ह्यातील पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनबाहेर गुरुवारी निदर्शने आणि घोषणाबाजी करणाऱ्या 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

(हेही वाचा – ‘अश्वत्थामा’ गेला तसं ‘मविआ’तला एक संजय जाणार, अनिल बोंडेंचा रोख कोणाकडे?)

पोलिसांनी आयपीसी 186/188/353/332/147/149/34 च्या कलमांखाली अटक केली आहे. आयपीसीचे हे कलम अधिकृत कामात अडथळा आणणे, दंगल किंवा हिंसाचार घडवण्यासाठी जमावात सामील होणे आणि गुन्हेगारी कृत्यासाठी एकत्र येणे यासंबंधी आहेत.

आतापर्यंत केलेली कारवाई

दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटने 31 लोकांविरुद्ध चिथावणीखोर भाषणे करून आणि सोशल मीडियावर पोस्ट करून द्वेषयुक्त संदेश पसरवल्याबद्दल दोन एफआयआर नोंदवले आहेत. त्यात असदुद्दीन ओवेसी, यती नरसिंहानंद आणि नुपूर शर्मा यांचा समावेश आहे. मुंबईनंतर नुपूरविरोधात दिल्लीतील ही दुसरी एफआयआर आहे.

या 31 जणांवर गुन्हा दाखल

सादाब चौहान, सबा नकवी, हफिजुल हसन अंसारी, बिहारी लाल यादव, इलियास सरफुदीन मौलाना मुफ़्ती नदीम, अब्दुर रहमान, आर विक्रमण, नगमा शेख, डॉ मोहम्मद करीम तुर्क, अतितुर रहमान खान, शुजा अहमद, विनीता शर्मा, इम्तियाज अहमद, असदुद्दीन ओवैसी, कुमार दिवशंकर, दानिश कुरैशी, यति नरसिंहानंद, स्वामी जितेंद्रनंद, लक्ष्मण दास, अनिल कुमार मीणा, काशिफ, मोहम्मद शाजिद शाहीन, कु सेनसई, गुलज़ार अंसारी, सैफ एड दिन कुतुज़ मौलाना सरफराज, पूजा शाकुन पांडेय, मिनाक्षी चौधरी आणि मसूद फयाज हासमी यांचा समावेश आहे.

कृती अहवाल गृह मंत्रालयाला दिला

प्रक्षोभक भाषण प्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या IFSC युनिटचा अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक घेतली. पोलिसांनी या लोकांवर वेगवेगळ्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.