‘अश्वत्थामा’ गेला तसं ‘मविआ’तला एक संजय जाणार, अनिल बोंडेंचा रोख कोणाकडे?

104

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू असून सहापैकी पाच जागेवरील उमेदवार विजयी होतील, मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी सहावी जागाही जिंकू, असा विश्वास व्यक्त केल्याचे समोर आले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – सोमय्यांमुळे राऊतांच्या अडचणी वाढणार! विधानभवनात पोहोचण्याआधीच न्यायालयाचं समन्स)

कोणतातरी एक संजय जाणार

राज्यसभेच्या तिनही जागेवर आमचा विजय होईल आम्ही शंभर टक्के जिंकणार, आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला त्या प्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणतातरी एक संजय जाणार, असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला आहे.

काय म्हणाले अनिल बोंडे

या निवडणुकीत संजय राऊत जाणार की संजय पवार जाणार यावर बोलताना भाजप नेते अनिल बोंडे म्हणाले, कोणता अश्वत्थामा गेला होता, हेदेखील धर्मराजाने सांगितलं नव्हतं. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. पण, महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार नक्की. सायंकाळपर्यंत कोणता ते कळेल. संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.