AAP : दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीने AAPची चिंता वाढवली

देशाची राजधानी दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. २६ एप्रिल रोजीच महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.

165
'AAP'चे सात राज्यसभेचे खासदार कुठे गायब आहेत?
  • वंदना बर्वे

दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आम आदमी पक्षाच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल तुरूंगात आहेत आणि राजकुमार आनंद यांनी मंत्रीपदासह पक्ष सोडला आहे. या सर्व घडामोडी महापौरपद जिंकण्याच्या स्वप्नावर विरजण तर सोडणार नाही ना? अशी भीती आपच्या मनात निर्माण झाली आहे. (AAP)

२६ एप्रिलला महापौर निवडला जाणार

देशाची राजधानी दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. २६ एप्रिल रोजीच महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. १८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. पालिका कायद्यानुसार एप्रिल महिन्यात होणाऱ्या पहिल्या सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक होणे आवश्यक आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसोबतच उपमहापौरपदाची निवडणूकही त्याच दिवशी होणार आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेची बैठक होणार आहे. (AAP)

महत्वाचा मुद्या असा की, महापौर पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम आदमी पक्षाची हार्टबिट वाढली आहे. पक्षाला एकजूट ठेवू शकेल असा एकही नेता सध्या आपमध्ये दिसून येत नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह डॉ. सत्येंद्र जैन सध्या तुरूंगात आहेत. (AAP)

संजय सिंग बाहेर… पण!

राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना जामीन मिळाला असला तरी पक्षाचे पदाधिकारी त्यांचं कितपत ऐकणार? हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी तुरूंगात असतानाच दिल्लीच्या मंत्री अतिशी यांना कारभार चालविण्याची अथॉरिटी दिली आहे. ही बाब संजय सिंग यांच्या जिव्हारी लागली असल्याची चर्चा आहे. (AAP)

सुनिता केजरीवाल शांत का झाल्या?

शिवाय, केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल या संजय सिंग तुरूंगातून बाहेर येईपर्यंत सक्रीय होत्या. परंतु, सिंग तुरूंगाबाहेर आले आणि सुनिता केजरीवाल यांची सक्रीयता हवेत विरली. यामुळे पक्षांतर्गत काही कुरघोडीपणा सुरू आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे. आणि याच कारणामुळे आपमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीवरून अस्वस्थता बघायला मिळत आहे. (AAP)

महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव

यंदा महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. याचा अर्थ असा की, अनुसूचित जातीतील विजयी नगरसेवकालाच हे पद मिळणार आहे. मात्र, आम आदमी पक्षातील दलित चेहरा राजकुमार आनंद यांनी नुकतेच केवळ मंत्रीपद नाही तर आमदारकीचा सुध्दा राजीनामा दिला आहे. अशात, मोठा गेम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमहापौरपदासाठी कोणताही नगरसेवक उमेदवारी देऊ शकतो. (AAP)

(हेही वाचा – Dr. Jyotsna Sanjay Kulkarni : दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणारी जगातील पहिली महिला लॅपरॉस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना संजय कुलकर्णी!)

भाजपा निवडणूक लढणार काय?

दुसरीकडे, भाजपा महापौरपदाची निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. आम आदमी पक्षाला विजयाप्रती आश्वस्त आहे. दिल्लीत दरवर्षी नवीन महापौर निवडण्याची परंपरा असली तरी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील महापौर निवडणुकीतील विजयामुळे जनतेत सकारात्मक संदेश जाईल. जो पक्ष जिंकेल त्याला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. (AAP)

एमसीडी निवडणुकीत आम आदमी पक्षाने जास्त वॉर्ड जिंकले आहेत. अशा परिस्थितीत एमसीडी सभागृहात स्पष्ट बहुमत असलेल्या आप नगरसेवकाचे नाव महापौरपदासाठी सुचवले जाऊ शकते. विरोधी पक्षांनी याला विरोध करून आपला उमेदवार निश्चित केल्यास या स्थितीत महापौर निवडून येतील. सभागृहात एकच उमेदवार असल्यास त्याची महापौरपदी नियुक्ती केली जाईल. (AAP)

येथे पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही

महत्वाचे म्हणजे, एमसीडीमधील एक वैशिष्ट्य म्हणजे कॉर्पोरेशन निवडणुकीत पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. त्यामुळे कोणताही नगरसेवक कोणत्याही उमेदवाराला मत देऊ शकतो. यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जातो की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मागील दोन महापौर निवडणुकीत संख्याबळ कमी असतानाही भाजपाने आपल्या सदस्यांना उमेदवारी दिली होती. (AAP)

आप-भाजपा पक्षाच्या नगरसेवकांवर लक्ष ठेवून आहेत

सध्या आम आदमी पक्ष आणि भाजप हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र महापौर निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे दिल्लीतील राज्यस्तरीय नेते आपापल्या पक्षाच्या नगरसेवकांवर लक्ष ठेवून आहेत. आम आदमी पक्षाला महापौरपदाची निवडणूक जिंकण्याचा विश्वास वाटत आहे. मात्र पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयीन कोठडीत तुरुंगात गेल्याने पक्षात निराशा आहे. (AAP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.