NCP : काँग्रेसचे ७ तर शरद पवार गटातील ५ आमदार आमच्या संपर्कात; अमोल मिटकरी यांचा दावा

131

काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या (NCP) नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे. यामध्ये काँग्रेसच्या ७ तर शरद पवार गटाच्या ५ आमदारांचा समावेश असल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात (NCP) कोणताही उमेदवार रिंगणात उतरवावा. पण त्याचा फायदा होणार नाही. अनिल तटकरे येऊ देत किंवा कोणी युगेंद्र-जोगेंद्र येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी त्यांना संपर्क करुन पाठिंबा दर्शवल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे काँग्रेसमधील अनेक नाराज आमदारांना भाजपची दारे खुली झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे आणखी १० ते ११ आमदार फुटू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

(हेही वाचा Riot : छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक; पोलिसांनी केला लाठीमार)

शरद पवारांच्या जवळचा नेता भाजपच्या वाटेवर?

शरद पवार यांच्या जवळचा मानला जाणारा बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चेचा रोख जयंत पाटील यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते. जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजप नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच ते पक्षांतर करतील, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.